UPI मध्ये AI ची एंट्री! PhonePe आणि OpenAI च्या हातमिळवणीने पेमेंट होणार आणखी ‘स्मार्ट’ 
विज्ञान तंत्रज्ञान

UPI मध्ये AI ची एंट्री! PhonePe आणि OpenAI च्या हातमिळवणीने पेमेंट होणार आणखी ‘स्मार्ट’

PhonePe Partnership With OpenAI: तुम्ही देखील सतत ऑनलाईन पेमेंटचा वापर करता का? तुम्ही देखील PhonePe युजर आहात का, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. PhonePe ने OpenAI सोबत केली भागिदारी केली आहे.

हर्षदा जाधव
  • PhonePe ने OpenAI सोबत केली भागिदारी
  • खरेदी करताना युजर्सना मिळणार AI ची मदत
  • युजर्सचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होणार

ऑनलाईन पेमेंट सर्विस PhonePe ने त्यांच्या युजर्ससाठी एक खास घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत PhonePe आणि OpenAI च्या भागिदारीची घोषणा केली आहे. PhonePe ने भारतातील त्यांच्या युजर्सना चॅटजीपीटीच्या सुविधा मिळाव्यात यासाठी OpenAI सह भागिदारी केल्याची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टच्या मालकीचे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस प्लॅटफॉर्म सॅन फ्रान्सिस्कोस्थित या आर्टिफशियल इंटेलिजेंस दिग्गजच्या तंत्रज्ञानाला त्यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये इंटिग्रेट करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

या भागिदारीबाबत अधिक माहिती देत PhonePe ने सांगितलं आहे की, कंपनीने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील युजर्सचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होणार आहे. याशिवाय खरेदी करताना युजर्सना अधिक चांगले आणि विचार करून निर्णय घेण्यासाठी मदत होणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, या भागिदारीमुळे फोनपे युजर्सना फोनपे कंज्यूमर्स अ‍ॅप आणि फोनपे फॉर बिजनेस अ‍ॅपद्वारे थेट चॅटजीपीटीच्या अ‍ॅडवांस्ड एआई सर्विसचा वापर करण्याची संधी मिळणार आहे.(फोटो सौजन्य – Pinterest) 

फोनपेवर चॅटजीपीटी-बेस्ड एक्सपीरिएंस मिळणार

तथापी, संपूर्ण चॅटबॉट इंटरफेस फोनपेचे कंज्यूमर अ‍ॅप आणि फोनपे फॉर बिजनेस अ‍ॅपद्वारे अ‍ॅक्सेस केले जाऊ शकणार नाही. मात्र तरी देखील युजर्सना पूर्ण प्लॅटफॉर्मवर चॅटजीपीटी-बेस्ड एक्सपीरिएंस मिळणार आहे. पोस्टमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की, AI असिस्टेंट यूजर्सना त्यांच्या पुढील प्रवासाचे नियोजन करण्यापासून ते शॉपिंग करण्यापर्यंत रोजच्या कामांसंबंधित सर्व महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी मदत करणार आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही पहिली पेमेंट नाही ज्यांनी AI दिग्गजसोबत भागिदारी केल्याची घोषणा केली आहे. ऑक्टोबरमध्ये रेजरपेने घोषणा केली होती की, त्यांनी चॅटजीपीटीवर एजेंटिक AI-आधारित यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) व्यवहारात आणण्यासाठी ओपनएआई आणि भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम (NPCI) सोबत भागिदारी केली होती.

फोनपे आणि ओपनएआईने केली स्ट्रेटेजिक पार्टनरशिप

एका प्रेस रिलीजमध्ये फोनपेने या AI दिग्गजसह सहकार्याची घोषणा केली आणि सांगितलं की, या निर्णयाचा उद्देश देशात चॅटजीपीटीचा आपलेपणा वाढवणं आणि यासोबतच 'परस्पर व्यावसायिक विकासाला प्रोत्साहन देणे' असा आहे. या करारांतर्गत, UPI प्लॅटफॉर्म अनेक वेगवेगळ्या कामांमध्ये युजर्सच्या मदतीसाठी चॅटजीपीटीच्या सुविधा इंटीग्रेट करणार आहे.

ओपनएआईने साजरा केला आनंद

ओपनएआयचे आंतरराष्ट्रीय धोरण प्रमुख ऑलिव्हर जे यांनी सांगितलं आहे की, “देशभरातील लोकांसाठी एआय अधिक सुलभ करण्याच्या आमच्या ध्येयात फोनपे सोबतचा आमचा सहयोग हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारत नाविन्यतेचे एक जागतिक केंद्र आहे आणि फोनपेला देशाच्या फॅब्रिक आणि त्याच्या यूजर्स आधाराची सखोल समज असल्याने ते एक आदर्श पार्टनर बनते." ओलिवर जे यांनी असं देखील सांगितलं आहे की, ही भागीदारी भारतातील यूजर्सना एआयचे अफाट मूल्य दाखवून देईल, याच्या मदतीने लाखो ग्राहकांना त्यांचे दैनंदिन जीवन सुधारण्यास मदत होणार आहे.

💡Frequently Asked Questions

Que: PhonePe वर UPI ID कशी तयार करायची?
Ans: अॅपमध्ये बँक खाते लिंक करून, MPIN सेट केल्यानंतर आपोआप UPI ID तयार होते.

Que: PhonePe मध्ये पैसे ट्रान्सफर कसे करायचे?
Ans: UPI ID, QR कोड, मोबाईल नंबर किंवा बँक अकाउंट डिटेल्स वापरून पैसे तत्काळ पाठवू शकता.

Que: पेमेंट फेल झाल्यास पैसे परत कधी येतात?
Ans: साधारणपणे 24–48 तासात पैसे परत येतात.

पुणे शहर विद्रूपीकरण पुरस्कारात सत्ताधारी पक्षाचे नेते अव्वल! स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना ‘साहेब’ किताब

World News : सौदी अरेबियाच्या रास तनुरा तेल रिफायनरीवर हौथींचा हल्ला; आगीचा दावा, चार ड्रोन पाडल्याची माहिती

Big Breaking: क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडणार! एकाच टीममध्ये पुरुष-महिला खेळणार; Zaheer khan च्या 'Equal' ची घोषणा

Pune Court Firing : 'महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का?' हर्षवर्धन सपकाळ संतापले; फडणवीस सरकारवर गंभीर आरोप!

Sachin Tendulkar Foundation : सारा आणि सानिया तेंडुलकर यांची रांचीतील युवा शाळेला भेट; मुलींसाठी उभारणार नवी शाळा