आपण आपल्या फोनमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी अनेक अॅप्स डाऊनलोड करतो. खरं तर कोणताही अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्या अॅपला आपल्याला वेगवेगळ्या परवानग्या द्याव्या लागतात. जसे कॅमेरा, मायक्रोफो, लोकेशन, इत्यादी. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या फोनमध्ये असे देखील अनेक अॅप्स आहेत जे तुमच्या परवनागीशिवाय तुमचे लोकेशन ट्रॅक करत असतात. यामुळे तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीवर परिणाम होतोच याशिवाय तुमची प्रायव्हसी आणि सुरक्षा देखील धोक्यात येते. अशा परिस्थितीत नक्की काय करावं, हे अनेकांना माहिती नसतं.
तुमची सुरक्षा तुमच्याच हातात आहे. म्हणजे तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून ही ट्रॅकिंग थांबवू शकता आणि तुमची सुरक्षा वाढवू शकता. आता आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि महत्त्वाच्या स्टेप्स सांगणार आहोत, या स्टेप्स फॉलो करून तुम्ही अँड्रॉईड आणि आयफोनमध्ये अप्सचे बॅकग्राऊंड लोकेशन ट्रॅकिंग बंद करू शकणार आहात. (फोटो सौजन्य – Pinterest)
कोणत्याही अपवर टॅप करा आणि त्याला केवळ गरज असेल तेव्हाच लोकेशन एक्सेस करण्याची परवागनी द्या. म्हणजेच तुम्ही "ओन्ली व्हाईल युजिंग द अॅप" (फक्त अॅप वापरताना) किंवा "आस्क एव्हरी टाईम" (प्रत्येक वेळी विचारा) हे पर्याय निवडू शकता. यामुळे तुम्ही तुमचे लोकेशन ऑन ठेवल्यावरच अॅप तुमचे लोकेशन ट्रॅक करू शकेल.
सकाही अप्स, जसे मॅप किंवा फूड डिलीवरी अॅप्स, यांना लोकेशनची गरज असते. यासाठी Precise Location बंद करा. यामुळे अॅपला तुमचे अचूक स्थान मिळणार नाही, तर फक्त अंदाजे क्षेत्र मिळेल, त्यामुळे तुमची गोपनीयता राखली जाईल.
काही ठरावीक आठवड्यानंतर तुमच्या लोकेशन सेटिंगची तपसाणी करत राहा. काहीवेळा अॅप अपडेट झाल्यानंचक पुन्हा सर्व परवाग्या मागतात. त्यामुळे नियमित तपासणी करून, तुम्ही नेहमीच ट्रॅकिंगपासून सुरक्षित राहू शकता.
Que: अॅप डाउनलोड कुठून करावे?
Ans: Android साठी Google Play Store, iPhone साठी Apple App Store वरून.
Que: अॅप चालण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे का?
Ans: काही अॅप्सला इंटरनेट आवश्यक असते, तर काही ऑफलाइनही चालतात. हे अॅपच्या प्रकारावर अवलंबून असते.
Que: अॅपमध्ये लॉगिन का आवश्यक असते?
Ans: युजर डेटा सिंक, पर्सनलाइज्ड अनुभव आणि सेव्ह केलेली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी.