पणजी – राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न घेऊन देशभरात जाण्याची घोषणा करणाऱ्या शिवसेनेच्या पदरात अपयश पडत असल्याचे चित्र आहे. गोव्यात काँग्रेससोबत जागावाटपावरुन चर्चा फिस्कटल्यानंतर स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय शिवसेना आणि राष्ट्रवादीने घेतला होता. आत्तापर्यंतच्या मतमोजणीत शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा आघाडीतही उल्लेख झालेला नाही. अद्याप मतमोजणी पूर्ण व्हायची असली तरी तृणमूलच्या खात्यात ३ ते ४ जागांवर आघाडी तरी दिसते आहे, मात्र शिवसेना-राष्ट्रवादीच्या पदरात प्रथ्मदर्शनी तरी काहीही पडलेले नाही असे दिसते आहे.
तर उ. प्रदेशात उमेदवार देऊनही तिथे शिवसेनेला फारसे यश पदरात पडताना दिसत नाहीये. उ. प्रदेशात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाऊन प्रचार केला होता. मात्र तिथे पक्षाची नोंदही होताना दिसत नाहीये. शिवसेनेला नेमकी किती मते मिळतात., याकडे राज्यातील जनतेचे लक्ष आहे.
[read_also content=”विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीचा राज्यावर होणार मोठा परिणाम, शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे भवितव्य ठरणार, राज्यात सत्तांतराचीही शक्यता https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/the-counting-of-votes-in-the-assembly-elections-will-have-a-big-impact-on-the-state-the-future-of-the-shiv-sena-ncp-alliance-will-be-nrps-252294.html”]
गोवा विधानसभेत 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान ( Goa Election 2022 ) झाले आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या जुन्या पक्षांसोबतच टीएमसी, आरजीपी, जय महाभारत पार्टी, गोएंचो स्वाभिमान पक्ष आणि संभाजी ब्रिगेड या पक्षांनीही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. गोवा विधानसभेचा कार्यकाळ हा 15 मार्चला संपत आहे. गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार ( Who Will Become Next CM Of Goa ) स्थापन होणार की त्रिशंकू विधानसभा होणार हे 10 मार्च म्हणजे आज कळणार आहे. त्यामुळे भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार की त्रिशंकू विधानसभा (Hung Assembly in Goa) होणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. गोव्यात गेल्या 10 वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे भापजाला यावेळी सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागतोय.