प्रीमियम लूकसह 2025 Toyota Fortuner Leader Edition लाँच
भारतीय ऑटो बाजारात SUV सेगमेंटमधील वाहनांना चांगली मागणी मिळते. यातही Toyota Fortuner चा तर एक वेगळाच चाहता वर्ग आहे. आज नेतेमंडळी आणि सेलिब्रेटींच्या कार कलेक्शनमध्ये हमखास फॉर्च्युनर कार पाहायला मिळते. आता या लोकप्रिय एसयूव्हीचे नवीन अपडेटेड व्हर्जन 2025 Fortuner Leader Edition लाँच केले आहे.
कंपनीने ही कार पूर्वीपेक्षा अधिक स्पोर्टी, प्रीमियम आणि आधुनिक डिझाइनसह लाँच केली आहे. हे एडिशन विशेषतः अशा ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आले आहे ज्यांना त्यांच्या कारमध्ये लक्झरी, पॉवर आणि मजबूत स्टाइल हवी आहे. टोयोटाचे म्हणणे आहे की फॉर्च्यूनर लीडर एडिशन भारतीय एसयूव्ही बाजारपेठेत प्रीमियम स्टॅंडर्ड वाढवेल आणि कंपनीच्या लक्झरी एसयूव्ही श्रेणीला आणखी मजबूत करेल. चला या एसयूव्हीच्या फीचर्सवर एक नजर टाकूया.
ट्रक लहान पण कीर्ती महान! मुंबईत जगातील पहिला 1 टन क्षमतेचा Electric Mini Truck लाँच, किंमत तर…
2025 Fortuner Leader Edition चे एक्सटिरिअर आधीपेक्षा खूपच डायनॅमिक आणि बोल्ड बनवले गेले आहे. या SUV मध्ये नवीन फ्रंट ग्रिल, स्पोर्टी बंपर स्पॉइलर आणि ब्लॅक ड्युअल-टोन रूफ सारखे डिझाइन अपडेट्स मिळाले आहेत. याशिवाय ब्लॅक ग्लॉसी अलॉय व्हील्स, क्रोम गार्निश, आणि बोनटवर “Leader” सिग्नेचर एम्ब्लेम देखील देण्यात आले आहे. ही SUV एटीट्यूड ब्लॅक, सुपर व्हाईट, पर्ल व्हाईट, आणि सिल्व्हर अशा चार रंगांमध्ये उपलब्ध असेल, जे तिला आणखी प्रीमियम लूक देतात.
Fortuner Leader Edition चे केबिन पूर्णपणे नवीन आणि अपग्रेडेड फील देते. यात ब्लॅक आणि मॅरून ड्युअल-टोन सीट्स असून प्रीमियम क्वालिटी मटेरियल्स वापरण्यात आले आहेत. SUV मध्ये आता ऑटो-फोल्डिंग मिरर, इल्यूमिनेटेड स्कफ प्लेट्स, आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) सारखे आधुनिक फीचर्स जोडले गेले आहेत.
कंपनीने SUV मध्ये 2.8-लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजन दिला आहे, जो 201 बीएचपी पावर आणि 500 एनएम टॉर्क जनरेट करतो. हे इंजन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. SUV सध्या Rear Wheel Drive (4×2) व्हेरिएंटमध्ये येते, जे उत्कृष्ट कंट्रोल आणि स्मूद ड्रायव्हिंग अनुभव देते. टोयोटा कंपनीचा दावा आहे की इंजन फ्युएल एफिशियन्सी आणि लाँग-ड्राइव कम्फर्ट लक्षात घेऊन ऑप्टिमाइझ केले आहे.
बाईक-स्कूटर खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार! Home Credit India तर्फे दुचाकी कर्ज सुविधा लाँच
2025 Toyota Fortuner Leader Edition ची बुकिंग ऑक्टोबर 2025 च्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होऊ शकते. ग्राहक ही एसयूव्ही ऑनलाइन पोर्टल किंवा जवळच्या टोयोटा डीलरशिप मध्ये जाऊन बुक करू शकतात. कंपनी बुकिंगसह एक्सचेंज ऑफर्स आणि स्पेशल फाइनान्स स्कीम्स देखील देत आहे, ज्यामुळे ही प्रीमियम SUV या फेस्टिव्ह सीझन मध्ये ग्राहकांसाठी आणखी आकर्षक पर्याय ठरते.