फोटो सौजन्य: Social Media
भारतात बाईकची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. ज्यात अनेक जण विविध सेगमेंटमधील बाईक खरेदी करत असतात. आज जरी भारतात सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाईक्सची विक्री होत असली, तरी स्पोर्ट बाईकची क्रेझ काही कमी होताना दिसत नाही. आज कित्येक तरुणांचे स्वप्न असते की त्यांनी स्पोर्ट बाईक खरेदी करावी. म्हणूनच तर अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या स्पोर्ट बाईक ऑफर करत असतात.
भारतात अनेक उत्तम दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत. त्यातीलच एक कंपनी म्हणजे टीव्हीएस. टीव्हीएसने स्पोर्ट बाईक सेगमेंटमध्ये Apache RTR ला सादर केले आहे. कंपनी ही बाईक वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये विकत असते. जर तुम्ही परवडणाऱ्या किमतीत Apache बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर RTR 160 2V मॉडेल तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो.
बाईक चोरी झाल्यास कसे मिळवाल इन्श्युरन्सचे सगळे पैसे? प्रत्येक बाईकस्वाराला ठाऊक असायलाच हवं
टीव्हीएसची Apache बाईक स्पोर्टी लूकसह येते आणि ती शक्तिशाली इंजिनने सुसज्ज आहे. जर तुम्हाला सुद्धा ही बाईक खरेदी करायची असेल तर तुम्ही डाउन पेमेंट आणि EMI वर Apache RTR 160 2V कसे खरेदी करू शकता, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
या टीव्हीएस बाईकची सुरुवातीची किंमत 1 लाख 20 हजार 420 रुपये आहे. राजधानी दिल्लीमध्ये या बाईकच्या बेस ब्लॅक एडिशनची ऑन-रोड किंमत 1 लाख 45 हजार रुपये आहे. ऑन-रोड किमतीत आरटीओ चार्ज आणि विम्याची रक्कम देखील समाविष्ट आहे. जर तुम्ही ही बाईक 20 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी केली तर तुम्हाला बँकेकडून 1 लाख 35 हजार रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला 9 टक्के व्याजदराने बाईक लोन मिळेल.
जर तुम्ही 3 वर्षांसाठी बाईक लोन घेतले तर तुम्हाला दरमहा 4 हजार रुपये ईएमआय भरावा लागेल. यासोबतच, 4 वर्षांसाठी ईएमआयची रक्कम अंदाजे 3 हजार रुपये असेल.
Maruti Ertiga च्या बेस व्हेरियंटसाठी 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?
या Apache बाईकमध्ये 159 सीसी, एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 15.3 बीएचपीची पॉवर आणि 13.9 एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते. भारतीय बाजारपेठेत, TVS Apache RTR 160 2V ची स्पर्धा बजाज पल्सर NS 160, Yamaha YZF R15 V3 आणि Suzuki Gixxer SF सारख्या बाईक्सशी आहे.
ही बाईक 5-स्पीड ट्रान्समिशनसह विकली जाते. तसेच ही बाईक प्रति लिटर सुमारे 45 किमी मायलेज देते. TVS Apache ची ऑन-रोड किंमत शहर आणि डीलरशिपनुसार बदलू शकते. तुम्हाला बाईक लोन किती व्याजदराने मिळेल हे तुमच्या वैयक्तिक क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते.