फोटो सौजन्य: @automobilindia8 (X.com)
इलेक्ट्रिक वाहनांची विक्री भारतीय ऑटो बाजारात झपाट्याने वाढताना दिसत आहे. ग्राहक देखील मार्केटमध्ये दाखल होणाऱ्या नव्या इलेक्ट्रिक कार्सना चांगला प्रतिसाद देत आहे. यातच आता मार्केटमध्ये एक नवीन इलेक्ट्रिक कार लाँच झाली आहे. MG Windsor EV चे अपडेटेड व्हर्जन म्हणून MG Windsor EV Pro लाँच झाली आहे.
जर तुम्ही अशा इलेक्ट्रिक कारच्या शोधात असाल ज्यामध्ये पॉवरफुल बॅटरी, लॉंग ड्रायव्हिंग रेंज आणि प्रगत तंत्रज्ञान असेल, तर एमजी विंडसर ईव्ही प्रो तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. चला या कारच्या कारमधील काही बेस्ट फीचर्स जाणून घेऊयात.
मार्केटमध्ये नुकतेच लाँच झालेल्या MG Motor Pro EV साठी किती करावे लागेल डाउन पेमेंट?
भारतात पहिल्यांदाच, एमजी विंडसर ईव्ही प्रो मध्ये 52.9kWh क्षमतेची मोठी बॅटरी आहे. ही बॅटरी कंपनीच्या आंतरराष्ट्रीय मॉडेल्सपेक्षा जास्त पॉवरफुल आहे. याचा अर्थ असा की आता ही कार जास्त अंतर कापण्यास अधिक सक्षम झाली आहे. त्यामुळे तुम्हाला ती पुन्हा पुन्हा चार्ज करण्याची चिंता करावी लागणार नाही.
या मोठ्या बॅटरीमुळे, एमजी विंडसर ईव्ही प्रो आता एकदा चार्ज केल्यावर 449 किलोमीटरपर्यंत धावू शकते. त्याची रेंज पूर्वीच्या तुलनेत 117 किलोमीटरने वाढली आहे. लांब प्रवास आणि हायवे ड्रायव्हिंगसाठी हा एक चांगला पर्याय बनला आहे.
आता तुम्हाला चार्जिंगसाठी तासंतास वाट पाहावी लागणार नाही. यामध्ये देण्यात आलेल्या 60 किलोवॅट डीसी फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानामुळे, ही कार फक्त 1 तासात 20% ते 80% पर्यंत चार्ज होते. जुन्या मॉडेलमध्ये 45 किलोवॅट चार्जिंग होते, जे यापेक्षा खूपच हळू होते.
अरे वाह ! Honda ची ‘ही’ कार खरेदी करणे अजूनच झाले स्वस्त, व्हेरियंटनुसार कमी झाल्यात किमती
एमजी विंडसर ईव्ही प्रो मध्ये आता अधिक प्रगत एडीएएस (Advanced Driver Assistance Systems) फीचर्स आहेत, जे तुमचे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण बनवतात. यामध्ये अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोलचा समावेश आहे, जे ट्रॅफिकनुसार कारचा स्पीड आपोआप अॅडजस्ट करते, ज्यामुळे वारंवार ब्रेक लावण्याची आणि वेग वाढवण्याची गरज दूर होते. लेन कीप असिस्ट कारला योग्य लेनमध्ये ठेवते, ज्यामुळे महामार्गांवर कार चालवणे अधिक सोपे होते.
एमजीने आता या कारमध्ये पॉवर्ड टेलगेटची सुविधा देखील जोडली आहे. याचा अर्थ तुम्ही आता फक्त एक बटण दाबून बूट उघडू किंवा बंद करू शकता. हे फिचर विशेषतः त्यांच्यासाठी उपयुक्त आहे जे नियमितपणे सामान लोड किंवा अनलोड करतात.
एमजी विंडसर ईव्ही प्रो आता V2L (Vehicle to Load) आणि V2V (Vehicle to Vehicle) तंत्रज्ञानासह येते, ज्यामुळे ती केवळ कार नाही तर एक पॉवर स्टेशन बनते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही तुमच्या कारच्या बॅटरीमधून थेट मोबाईल डिव्हाइस, घरगुती इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आणि इतर इलेक्ट्रिक वाहने चार्ज करू शकता.