Toyota Urban Cruiser चा 'हा' खास एडिशन झाला लाँच
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम ऑटो कंपन्या कार्यरत आहेत, ज्या ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार दमदार कार ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणेज टोयोटा मोटर्स. कंपनीच्या कार नेहमीच उत्तम परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात. नुकतेच कंपनीने त्यांच्या एका कारचा नवीन एडिशन मार्केटमध्ये लाँच केला आहे.
टोयोटा कंपनी मिड साइझ एसयूव्ही म्हणून मार्केटमध्ये Urban Cruiser Hyryder ऑफर करत आहे. आता, ही एसयूव्ही नवीन एरो एडिशनसह लाँच करण्यात आली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
टोयोटाची मध्यम आकाराची एसयूव्ही ऑफर, अर्बन क्रूझर हायराइडर, भारतीय बाजारात एरो एडिशनसह लाँच करण्यात आली आहे. या एडिशनमध्ये कंपनीने अनेक कॉस्मेटिक बदल केले आहेत.
टोयोटाने आपल्या लोकप्रिय SUV अर्बन क्रूझर हायरायडरचा नवीन एअरो एडिशन बाजारात लाँच केला आहे. या विशेष एडिशनमध्ये कंपनीने नव्या फ्रंट स्पॉयलर, रियर स्पॉयलर, साइड स्कर्ट आणि खास स्टाइलिंग किटचा समावेश केला आहे, ज्यामुळे वाहनाचा लुक आणखी स्पोर्टी आणि प्रीमियम दिसतो.
रिपोर्टनुसार, या नवीन एडिशनमध्ये इंजिन विभागात कंपनीने कोणताही बदल केलेला नाही. हायरायडरमध्ये पूर्वीप्रमाणेच तीन इंजिन पर्याय दिले जात आहेत – 1.5-लिटर पेट्रोल इंजिन, स्ट्रॉंग हायब्रिड इंजिन, आणि CNG पर्याय.
यासोबत 5-स्पीड आणि 6-स्पीड ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजेच परफॉर्मन्सच्या बाबतीत ही SUV पूर्वीइतकीच दमदार राहणार आहे.
आता Hyundai कंपनी ‘ही’ भारतीय व्यक्ती सांभाळणार! मिळाली CEO आणि MD पदाची जबाबदारी
टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडरची एक्स-शोरूम किंमत ₹10.94 लाखांपासून सुरू होते. या नवीन एअरो एडिशन किट सर्व व्हेरिएंट्ससाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या किटसाठी ग्राहकांना 31,999 रुपये अतिरिक्त भरावे लागतील.
ही मिड-साईज SUV सेगमेंटमध्ये टोयोटा हायरायडरचा सामना Hyundai Creta, Kia Seltos,Honda Elevate,Tata Harrier आणि Volkswagen Taigun सारख्या कारसोबत होतो. या सर्व प्रतिस्पर्ध्यांमध्ये हायरायडरचा हायब्रिड पर्याय आणि आता आलेला एअरो एडिशन या कारला एक वेगळी ओळख देईल.