फोटो सौजन्य: SSR SANJU/ YouTube
शेतकऱ्याचा रुबाब हा नेहमीच वेगळा असतो. आजही शहरी वातावरणातून कंटाळा आल्यावर अनेक जण आपल्या गावी जातात दिसतात, जिथे ते दोन क्षण सुखाचे आणि समाधानाचे अनुभवू शकतील. आता गाव म्हंटलं की शेतकरी आलाच. अशाच एका बंगळुरू मधील तरुण शेतकऱ्याची मोठी चर्चा होताना दिसत आहे.
बंगळुरूतील शेतकरी संजूचा एक व्हिडिओ Social Media वर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो Toyota Vellfire या आलिशान कारची डिलिव्हरी घेण्यासाठी चक्क बैलगाडीवरून शोरूममध्ये पोहोचला आहे. शहरातील रहदारीतून प्रवास करणाऱ्या त्याच्या बैलगाडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचा हा व्हिडिओ लगेचच व्हायरल झाला. त्याची एन्ट्री इतकी अनोखी होती की वाटेत लोकांनी त्याच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली.
Raj Kumar Rao ने खरेदी केली ‘ही’ आलिशान कार, किंमत तब्बल 2.15 कोटी
शेतकरी संजू त्याच्या ग्रामीण लाइफस्टाइल आणि सोशल मीडियावर सक्रिय उपस्थितीसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे आधीच Porsche Panamera, Ford Mustang, Maserati Levante, Toyota Fortuner आणि Innova Hycross सारख्या अनेक आलिशान कार्स आहेत. पण यावेळी त्याने त्याच्या नवीन टोयोटा वेलफायरची डिलिव्हरी एका वेगळ्या अंदाजात घेतली आहे.
यूट्यूबवर अपलोड केलेल्या “Farmer Buying Luxury Car या व्हिडिओमध्ये सुरुवातीला, संजूच्या घराबाहेर आणि ऑफिसबाहेर त्याच्या लक्झरी कारची रांग दाखवण्यात आली आहे. लोकांना वाटले होते की तो नेहमीप्रमाणे प्रीमियम कारमध्ये शोरूममध्ये येईल, परंतु यावेळी त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. पांढरा कुर्ता-धोती, जड सोन्याची चेन आणि अंगठ्या घालून, संजू पारंपारिक बैलगाडीवर स्वार झाला आणि शोरूमकडे निघाला. कोट्यवधी किमतीच्या कारचा मालक बैलगाडीवरून प्रवास करत असल्याचे पाहून लोकं आश्चर्यचकित झाले.
September 2025 मध्ये ‘या’ 7 सीटर कारची जोरदार डिमांड, जाणून घ्या टॉप 5 वाहनं
संजू टोयोटा डीलरशिपवर पोहोचला, तेव्हा कर्मचाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यांने बैलगाडीतून उतरून पूजा-पाठ करून आपल्या नवीन टोयोटा वेलफायरची (Toyota Vellfire) डिलिव्हरी घेतली. या आलिशान MPV ची किंमत अंदाजे ₹1.5 कोटी (एक्स-शोरूम) आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी फुलांचे हार घालून कार सजवली आणि शेतकरी संजूचे अभिनंदन केले. डिलिव्हरीनंतर संजूने पूजा केली आणि आपल्या नवीन कारमधून घरी जाण्यासाठी मार्गस्थ झाले.
टोयोटा वेलफायर (Toyota Vellfire) भारतात एक अत्यंत आलिशान MPV म्हणून ओळखली जाते. यात दोन कॅप्टन सीट्स, रूफ-माउंटेड एन्टरटेन्मेंट सिस्टीम आणि इलेक्ट्रिक रीक्लाइनिंग सीट्स दिली आहेत. इंटिरिअरमध्ये फुल डिजिटल क्लस्टर, व्हेंटिलेटेड आणि हीटेड सीट्स, आणि इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल स्टीयरिंग व्हीलसारखे प्रीमियम फीचर्स मिळतात.