फोटो सौजन्य: @ViratGang (X.com)
भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की भारतात एक वेगळेच वातावरण निर्माण होत असते. त्यातही आपल्याकडे क्रिकेट फक्त एक खेळ नाही भावना आहे. म्हणूनच जेव्हा भारत पाकिस्तानची मॅच असते तेव्हा खेळाडूंवर सुद्धा दडपण असते. पण अनेकदा काही असे देखील खेळाडू असतात ज्यांच्यावर पूर्ण भारतीयांचा विश्वास असतो आणि ते त्या विश्वासावर खरे देखील उतरतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे विराट कोहली.
विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आहे. विराटचे नाव केवळ देशातीलच नाही तर जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणले जाते. सध्या चॅम्पियन ट्रॉफी सुरू आहे, ज्यामध्ये विराट कोहलीने 23 जानेवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात शतक झळकावले आणि देशाला विजयी केले. पण तुम्हाला माहिती आहे का विराट कोहलीने खरेदी केलेली पहिली कार कोणती होती आणि आज त्या कारची किंमत किती आहे? चला याबद्दल जाणून घेऊया.
आता Renault च्या कारमध्ये मिळेल CNG चा पर्याय, किमतीत होणार बदल
विराट कोहलीची पहिली कार टाटा सफारी होती. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत विराटने स्वतः हे उघड केले आहे. विराटने ही कार खरेदी करण्यामागे एक कारण होते. कोहलीने मुलाखतीत सांगितले की, त्यावेळी सफारी ही अशी कार होती की जेव्हा ती रस्त्यावर धावायची तेव्हा समोरून येणारी कार तिला पाहून आपोआप बाजूला सरकायची. या कारची विक्री देखील झपाट्याने होत होती ज्यामुळे विराटला ही कार खरेदी करायची होती.
विराट कोहलीने त्याच मुलाखतीत एक धम्माल किस्सा देखील सांगितला. त्याने सांगितले की एकदा तो आणि त्याचा भाऊ टाटा सफारी घेऊन फिरायला गेले होते, तेव्हा ते या कारमध्ये डिझेल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावर पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर, जेव्हा त्याने कारमध्ये इंधन भरले तेव्हा त्यांनी चुकून डिझेलऐवजी त्यात पेट्रोल भरले.
कार खरेदीदारांनो व्हा तयार ! या दमदार Cars वर मिळत आहे आतापर्यंतचा सर्वात जास्त डिस्काउंट
टाटा सफारी अजूनही भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहे. बाजारात या कारचे एकूण 32 व्हेरियंट आहेत. ही कार सहा रंगांच्या पर्यायांसह येते. टाटा सफारीची एक्स-शोरूम किंमत 15.50 लाख रुपयांपासून सुरू होते. या टाटा कारला ग्लोबल एनसीएपी कडून क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग देखील मिळाले आहे. या कारमध्ये व्हॉइस असिस्टेड पॅनोरॅमिक सनरूफसह अनेक सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत.
टाटा सफारीच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यात मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन, वायरलेस मोबाइल कनेक्टिव्हिटी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अँबियंट लाइटिंग, टू स्पोक स्टीअरिंग व्हील, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, एअर प्युरिफायर आणि क्रूझ कंट्रोल आहे. कारच्या सेफ्टीसाठी, 360 डिग्री कॅमेरा, 7 एअरबॅग्ज, हिल असिस्ट, ESC, TPMS, ADAS सूट सारख्या सुविधा उपलब्ध आहेत.