(फोटो- Mercedes-Benz)
भारतीय ऑटो मोबाइल क्षेत्रात होतेय मोठी क्रांती
इलेक्ट्रिक वाहनांची वाढली मागणी
मर्सिडिज बेंझने सादर केली ईव्ही कार
Mercedes-Benz CLA 250+: सध्या भारतीय ऑटो मोबाइल क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. बाजारात नवनवीन मॉडेल्स सादर केले जात आहेत. भारतीय बाजरांपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. काही वर्षांपूर्वी लोक ई-कार खरेदी करताना ‘रेंज’ या चिंतेमुळे खरेदी करण्यासाठी मागेपुढे करायचे. मात्र आता गाड्यांना मागणी वाढली आहे. जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंजने आपली इलेट्रिक कार सादर केली आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.
मर्सिडीज-बेंजने भारतात Mercedes-Benz CLA 250+ ही नवीन इलेक्ट्रिक कार लॉंच केली आहे. या कारच्या अफाट ड्रायव्हिंग रेंजने संपूर्ण ऑटोमोबाईल जगताला थक्क करून सोडलं आहे. मर्सिडीजच्या या कारमुळे अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. एकदा चार्ज केल्यावर ही कार जवळपास 792 किमी धावते.
मर्सिडीजच्या ‘या’ कारमध्ये काय आहे खास?
मर्सिडीज-बेंज CLA 250+ मध्ये कंपनीने मोठा बॅटरी पॅक दिले आहे. कंपनीचा दावा आहे कि ही कार एकदा फुल चार्ज केली की तब्बल 792 किलोमीटर धावू शकते. या कारची टेस्टिंग करण्यात आले तेव्हा तिचे 84 टक्के चार्जिंग शिल्लक असूनही डिजिटल डिस्प्लेवर तब्बल ५३० किलोमीटरपेक्षा जास्तची रेंज दिसत होती. एसी चालू असूनही आणि ट्रॅफिकचा सामना करावा लागूनही कारची अंदाजित रेंज ५०० किलोमीटरच्या खाली कधीच कमी झाली नाही.
वाढत्या पेट्रोलचा भार सहन होईना! EV च्या मागणीत तुफान वाढ, भारतात वेगाने बदलत आहे Auto Sector
मर्सिडीज-बेंजच्या नवीन Mercedes-Benz CLA 250+ ने ऑटोमोबाइल क्षेत्रात खळबळ उडवली आहे. यामागे मर्सिडीजचे इंजिनिअरिंग आणि आधुनिक टेक्नॉलॉजी याचे हे यश असल्याचे म्हटले जात आहे. या कारमध्ये हवेचा अडथळा कमी करता एएल अशी सोय देण्यात आली आहे. यामुळे गाडीच्या बॅटरीवर परिणाम जाणवत नाही. अन्य इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये एकच गियर असतो. मात्र या कारमध्ये 2 स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ॲडव्हान्स रिजनरेटिव्ह ब्रेकिंग या कारचे मुख्य आकर्षण आहे. वाया जाणारी ऊर्जा विजेत बदलून पुन्हा बॅटरीमध्ये स्टोअर केली जाते. कारमध्ये एआय सिस्टिम देण्यात आली आहे. सिस्टीम थेट ड्रायव्हरचा मूड ओळखून प्रतिसाद देते, ज्यामुळे गाडी चालवण्याचा अनुभव अत्यंत स्पोर्टी आणि हाय-टेक बनतो.






