फोटो सौजन्य; iStock
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार बेस्ट कार लाँच करत आहेत. यातीलच एक आघाडीचे नाव म्हणजे टोयोटा. टोयोटाने देशासह जगभरात उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत. मात्र, यात सर्वात जास्त डिमांड ही टोयोटा फॉर्च्युनरला असते.
भारतीय मार्केटमध्ये टोयोटा फॉर्च्युनरची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. अनेक सामान्य ग्राहकांपासून ते सेलिब्रेटी मंडळी, कित्येक जणांच्या कार कलेक्शनमध्ये टोयोटा फॉर्च्युनरचा समावेश असतो. सध्या टोयोटा एका नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर काम करत आहे, जी लवकरच ग्लोबल मार्केटमध्ये सादर केली जाऊ शकते. या एसयूव्हीला ‘लँड क्रूझर FJ’ असे नाव देण्यात आले आहे. हे आयकॉनिक लँड क्रूझर सिरीजमधील सर्वात कॉम्पॅक्ट आणि परवडणारे मॉडेल असेल, त्याला ‘मिनी फॉर्च्यूनर’ म्हणता येईल.
40 हजारांच्या पगारात सुद्धा खरेदी करता येईल या 5 धमाकेदार एसयूव्ही, अनेक उत्तम फीचर्सने असेल सुसज्ज
खरंतर, जपानच्या कार मासिकाने दावा केला आहे की टोयोटा 2025 च्या जपान मोबिलिटी शोमध्ये लँड क्रूझर एफजेचे अनावरण करणार आहे. हा मोबिलिटी शो 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
2023 मध्ये लँड क्रूझर लाइनअप LC300, LC250 (प्राडो) आणि 70 सिरीजसोबत उभी असलेली टीझर इमेजद्वारे ही SUV पहिल्यांदा दाखवण्यात आली होती. यानंतर, FJ नावासाठी ट्रेडमार्क दाखल करण्यात आला.
टोयोटा लँड क्रूझर एफजेचे डिझाइन आतापर्यंत पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली होती, परंतु 2023 मध्ये रिलीज झालेल्या एकमेव टीझर इमेजवरून असे म्हणता येईल की तिचा लूक खूपच रफ-टफ आणि बॉक्सी असणार आहे. त्यात आधुनिक एलईडी लाइटिंग सिस्टम असेल, जी त्याला आधुनिक आणि प्रीमियम लूक देईल. शिवाय, उच्च ग्राउंड क्लिअरन्स आणि जाड टायर्समुळे ते ऑफ-रोडिंगसाठी सज्ज होते. टेलगेटवर बसवलेले स्पेअर व्हील तिच्या क्लासिक एसयूव्ही लूकला आणखी दमदार बनवतो.
Tata Motors पुन्हा एकदा नवीन EV मार्केटमध्ये लाँच करण्याच्या तयारीत, मिळणार 500 KM पेक्षा जास्त रेंज
टोयोटा लँड क्रूझर एफजेमध्ये 2.7 -लिटर 2TR-FE नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असण्याची अपेक्षा आहे, जे 161 बीएचपीची जास्तीतजास्त पॉवर आणि 246 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले जाईल, जे चारही चाकांना पॉवर पाठवण्यासाठी 4WD सिस्टम वापरेल. टोयोटा काही आंतरराष्ट्रीय मार्केटमध्येमध्ये या मॉडेलसाठी हायब्रिड पॉवरट्रेन पर्याय देखील देऊ शकते.
यात एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की टोयोटाने भारतात लँड क्रूझर एफजे लाँच करण्याची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही, परंतु ज्या पद्धतीने एसयूव्ही सेगमेंटमध्ये भारतात प्रचंड वाढ होत आहे. हे लक्षात घेता, ही एसयूव्ही भारतात येण्याची संभावना आहे.