फोटो सौजन्य: iStock
भारतीय कुटुंब पद्धतीत सोन्याला खूप महत्व आहे. म्हणूनच तर कमी उत्पन्न असणाऱ्यांपासून ते जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबापर्यंत, अनेक जण सोन्यात आपापल्या परीने गुंतवणूक करत असतात. सध्या, गुंतवणुकीच्या अनुषंगाने सुद्धा सोन्याकडे सकारात्मकतेने पहिले जात आहे. तसेच सोन्याच्या किमतीला सुद्धा झळाळी आली आहे. काही वर्षांपूर्वी जे सोनं फक्त काही हजारांवर होतं. तेच आज लाखांच्या घरात पोहोचला आहे.
गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या परिस्थितीमुळे सामान्य व्यक्तीसाठी सोने खरेदी करणे कठीण झाले आहे. लग्नासाठी सोने खरेदी करण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी यामुळे नक्कीच समस्या निर्माण झाली आहे. सोन्याचे मूल्य सतत वाढत आहे. काही वर्षांपूर्वी एक किलो सोन्याच्या किमतीत फक्त Alto कार खरेदी करता येत होती. मात्र, आता एक किलो सोन्याच्या किमतीत तुम्ही एकापेक्षा दमदार एसयूव्ही खरेदी करू शकतात. चला जाणून घेऊयात, 2015 ते 2025 पर्यंतच्या कालावधीत 1 Kg सोन्याच्या किमतीत तुम्ही कोणती कार खरेदी करू शकता.
2015 साली 1 किलो सोन्याची किंमत अंदाजे 25 लाख रुपये होती. या किमतीत महिंद्राची लोकप्रिय एसयूव्ही XUV700 खरेदी केली जाऊ शकते.
Royal Enfield आणि KTM चे टेन्शन वाढलंय! TVS ची ॲडव्हेंचर बाईक झाली लाँच, किंमत इतकीही महाग नाही
2017 येईपर्यंत सोन्याची किंमत 28 लाखांपर्यंत पोहोचली होती. या किमतीत तुम्ही Tata Motors ची लोकप्रिय आणि आघाडीची कार Tata Harrier खरेदी केली जाऊ शकते.
2019 उजाडले तेव्हा सोन्याची किंमत 35 लाखांपर्यंत पोहोचली होती. आता याच किमतीत तुम्ही प्रीमियम लक्झरी कार खरेदी करू शकता. जसे की सेकंड हॅन्ड BMW कार.
2021 सालापर्यंत 1 किलो सोन्याची किंमत 48 लाखांवर पोहोचली होती. आता तुम्ही या किमतीत सेकंड हॅन्ड नाही तर नवीन कोरी BMW कार खरेदी करू शकता, जसे की BMW218.
आता 2024 येता येता एक किलो सोन्याची किंमत 65 लाखांवर पोहोचली आहे. आता या किमतीत तुम्ही लक्झरी इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकता, जसे की KiaEV6.
फक्त शहरात नाही तर गावात सुद्धा ‘या’ Mileage Bikes चा दरारा! किंमत iPhone 15 पेक्षा कमी
आता 2025 मध्ये 1 किलो सोन्याची किंमत तब्बल 1 कोटींच्या पार केली आहे आणि आता तुम्ही या किमतीत Range Rover Evoque कार खरेदी करू शकतात.