फोटो सौजन्य: Social Media
जर तुम्ही दररोजच्या प्रवासासाठी उत्तम मायलेज आणि किफायतशीर स्कूटर शोधत असाल, तर TVS Jupiter 110 तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय ठरू शकते. ही स्कूटर दमदार मायलेजसह चांगल्या परफॉर्मन्समध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही ही स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर पूर्ण रक्कम न भरता ती फायनान्स करून घेण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. चला, TVS Jupiter 110 ची किंमत, डाउन पेमेंट आणि EMI डिटेल्स बद्दल जाणून घेऊयात.
दिल्लीमध्ये TVS Jupiter 110 ची ऑन-रोड किंमत सुमारे 94,000 आहे, ज्यामध्ये RTO चार्ज आणि विमा यांचा समावेश आहे. तुम्ही ही स्कूटर फायनान्सवर घेण्याचा विचार करत असाल, तर किमान 10,000 डाउन पेमेंट आवश्यक आहे. उर्वरित 84,000 रुपयांसाठी तुम्हाला बँकेकडून लोन घ्यावे लागेल.
Kia Sonet Vs Maruti Breeza: मायलेज, इंजिन, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती कार आहे बेस्ट?
जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर तुम्हाला हे कर्ज 9% व्याजदराने मिळू शकते. अशा परिस्थितीत तुमची मासिक EMI सुमारे ₹3,000 इतका असेल. कर्जाची कालावधी 3 वर्षांची असल्यास, एकूण व्याज रक्कम सुमारे 22,000 रुपये इतकी येईल. त्यामुळे एकूण 1.06 लाख रक्कमेची परतफेड करावी लागेल.
TVS Jupiter 110 मध्ये आता OBD-2B सेन्सर टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. यामुळे स्कूटरमध्ये थ्रोटल रिस्पॉन्स, एअर-फ्युएल मिक्सचर, इंजिनचे तापमान, फ्युएल व्हॉल्युम आणि इंजिन स्पीड यासारख्या घटकांचे रिअल-टाईम मॉनिटरिंग शक्य होते. यामध्ये असलेला ECU (Engine Control Unit) ऑनबोर्ड इंटेलिजन्सच्या मदतीने स्कूटरच्या परफॉर्मन्सला पर्यावरणाशी जुळवून घेण्यास मदत करतो, ज्यामुळे प्रदूषण देखील कमी होते.
सिंगल चार्जवर 548 KM ची रेंज ! प्रिमियम इलेक्ट्रिक कार MG M9 झाली लाँच, किंमत किती?
या स्कूटरमध्ये 113.3cc चे एअर-कूल्ड, फ्युएल इंजेक्शन टेक्नॉलॉजीने सुसज्ज इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5,000 rpm वर 7.91 bhp पॉवर आणि 9.2 Nm टॉर्क निर्माण करते. मात्र, CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा वापर केल्यास आणि इलेक्ट्रिक असिस्टचा फायदा घेतल्यास, टॉर्क 9.8 Nm पर्यंत वाढतो. ही स्कूटर कमाल 82 किमी/तास टॉप स्पीड गाठू शकते.
TVS Jupiter 110 ही फक्त स्वस्तात मस्त स्कूटर नाही, तर मायलेज, टेक्नोलॉजी आणि आरामदायी राइडचे उत्तम कॉम्बिनेशन आहे.