फोटो सौजन्य - Social Media
मंदिरापासून ते चंद्रभागा घाटापर्यंत स्वच्छता
या पथकाद्वारे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर, मंदिराकडे जाणारे सर्व मुख्य रस्ते, सुमारे १०० एकर क्षेत्र तसेच पवित्र चंद्रभागा नदीच्या घाटांची नियमित स्वच्छता केली जात आहे. केवळ कचरा संकलनच नव्हे, तर कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, विल्हेवाट आणि भाविकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्याचे कार्यही ही टीम करत आहे.
उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक
आषाढी वारीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंढरपूर दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्वच्छता अभियानाची पाहणी केली. भाविकांसाठी स्वच्छ वातावरण निर्माण केल्याबद्दल त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौतुक करत सुमीत ग्रुपच्या योगदानाचे अभिनंदन केले.
“पवित्र भूमीची सेवा हीच खरी भक्ती”
सुमीत ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष सुमीत साळुंके यांनी व्यक्त केले की, “पंढरपूर हे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या पवित्र भूमीची सेवा करण्याची संधी मिळणे हा आमचा अभिमान आहे. प्रत्येक वारकऱ्याचा प्रवास स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानजनक व्हावा, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.”






