भारत पाकिस्तान आमनेसामने (फोटो- सोशल मिडिया)
24 जुलै रोजी भारतीय पुरुष संघ 2 सामने खेळणार आहे. ज्यामध्ये पहिला सामना ओमानविरुद्ध होणार आहे. तर दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. याआधी भारतीय पुरुष संघ मागील 4 सामन्यात बांग्लादेशला 2 वेळेस तर ओमान आणि पाकिस्तानला पराभूत करून आली आहे.
Commonwealth Games 2026 मध्ये भारताला धक्का; पदकाची दावेदार तूलिका मानवर NADA ची कारवाई, प्रकरण काय?
युथ हॉकी ५एस आशियाई चॅम्पियनशिप २०२६ ही एफआयएच हॉकी ५एस विश्वचषक २०२६ साठी एक प्रकारची पात्रता असणार आहे. आशियातील सर्वात यशस्वी युवा हॉकी खेळाडू वर्ल्डकपमध्ये जागा मिळवण्यासाठी लढाई लढत आहेत. भारतीय संघ 24 जुलै रोजी म्हणजे आज भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता आपला पहिला सामना ओमानविरुद्ध खेळणार आहे. तर दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध भारतीय वेळेनुसार 10.30 वाजता सुरू होणार आहे.
Yash Thakur चे इंटरनॅशनल पदार्पण! श्रेयस अय्यरने सोपवली डेब्यू कॅप, वाचा कशी आहे कारकीर्द?
या स्पर्धेत पुरुष आणि महिला संघ खेळत आहेत. ही स्पर्धा 25 जुलैपर्यंत चालू राहणार आहे. या स्पर्धेत शेवटचे दोन सामने अत्यंत रोमांचक होण्याची शक्यता आहे. भारत अन् पाकिस्तान आमनेसामने येणार असल्याने चाहते खुश झाले आहेत. भारतीय पुरुष संघ आणि महिला संघ आज प्रत्येकी दोन सामने खेळणार आहेत. पहिलं सामना भारत आणि चीन यांच्यात होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होणार आहे. तर दुसरा सामना रात्री 10 वाजता उझबेकिस्तानशी होणार आहे.
ओमानची राजधानी मस्कत येथे सुरू असलेल्या FIH यूथ हॉकी5s एशियन चॅम्पियनशिप २०२६ मध्ये भारतीय सब-ज्युनियर पुरुष हॉकी संघाने आपल्या विजयाचा धडाका कायम ठेवला आहे. २४ जुलै रोजी पार पडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या दोन सामन्यांत भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारल्याचे पाहायला मियालले. रात्री पार पडलेल्या हाय-व्होल्टेज महामुकाबल्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ७-३ असा दणदणीत पराभव केला.






