(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
देशातील सर्वात मोठी विमानसेवा कंपनींपैकी एक म्हणजे IndiGo. नुकताच कंपनीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयात कंपनीने हे स्पष्ट केलंय की काही ठरावीक मार्गावरुन आता त्यांची विमानं धावणार नाहीत. पण नेमका हा निर्णय का घेतला गेलाय? यामुळे नेमका काय परिणाम होणार आहे? समजून घेऊयात.
Share Market Today: अशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात! तज्ज्ञांनी दिला सावध राहण्याचा इशारा
कंपनी ३१ ऑगस्टपासून युनायटेड किंगडममधील मँचेस्टर शहरासाठीची आपली विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करणार आहे. या निर्णयामागे कंपनीने वाढती परिचालन आव्हाने आणि वाढता खर्च ही कारणे दिली आहेत. आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रावर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे निर्माण झालेला आर्थिक दबाव आणि कामकाजातील व्यत्ययांचा सामना कंपनी करत असतानाच, हे पाऊल उचलण्यात आले आहे.
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. यामध्ये इराणपासून ते कुवेत, इराक, सीरिया आणि लेबनॉनपर्यंतच्या देशांचा समावेश आहे. या सर्वांनी सुरक्षा धोक्यांची शक्यता लक्षात घेऊन आपल्या हवाई मार्गांवर निर्बंध लादले आहेत. या निर्बंधित हवाई क्षेत्रांना टाळण्यासाठी, विमानांना अधिक सुरक्षित देशांवरून उड्डाण करण्यास भाग पडत आहे. परिणामी, भारत आणि युरोपच्या दिशेने जाणाऱ्या विमानांचा प्रवासाचा मार्ग लक्षणीयरीत्या वाढला आहे.
Indigo विमान कंपनी सध्या मँचेस्टरला दिल्ली आणि मुंबई या दोन्ही शहरांशी जोडते. या सेवांची सुरुवात गेल्या वर्षी जुलै महिन्यात करण्यात आली होती. या सगळ्यात आपल्या दीर्घ-पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कना बळकट करण्याच्या ‘इंडिगो’च्या व्यापक प्रयत्नांचाच एक भाग होता. एका निवेदनात कंपनीने नमूद केले की, “आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रात सध्या लागू असलेल्या निर्बंधांमुळे, विमानांच्या प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या वाढला आहे आणि खर्चाची परिस्थितीही आव्हानात्मक बनली आहे. याच कारणांमुळे, इंडिगोला ३१ ऑगस्ट २०२६ पासून मँचेस्टरला जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या आपल्या विमानांचे कामकाज तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करणे भाग पडले आहे.”
एकंदरीत पाहता, कंपनीसमोर अनेक आव्हाने उभी आहेत; यामध्ये दीर्घ-पल्ल्याच्या मार्गांवर वाढलेला प्रवासाचा कालावधी, ATF च्या वाढत्या किमती आणि परकीय चलन दरातील चढ-उतारांमुळे वाढलेला परिचालन खर्च यांचा समावेश होतो.
आपल्या दीर्घ-पल्ल्याच्या विमानसेवांच्या पुनर्रचनेचा एक भाग म्हणून, IndiGo ‘Norse Atlantic Airways’ कडून भाडेतत्त्वावर ‘Boeing 787-9 Dreamliner’ हे विमान घेतलं होतं पण ते आता परत करणार आहे. खरंतर हा निर्णय कंपनीसाठी कठीण ठरणार आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीतच या विमान कंपनीला ₹२,५३६.९ कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. जो, मागील वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या ₹३,०६७.५ कोटींच्या नफ्याच्या तुलनेत एक मोठा आणि लक्षणीय बदल दर्शवतो. त्यामुळे जागतिक परिस्थिती स्थिरावे पर्यंत विमानसेवांसोबतच इतर घटकांवर नेमका काय परिणाम होतोय हे पहावं लागेल.
Todays Gold-Silver Price: ज्वेलरी खरेदीचा प्लॅन करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर






