(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, फेब्रुवारी २०१२ मध्ये भारताने पाच शहरांमध्ये म्हणजेच कोची, म्हैसूर, जयपूर, भुवनेश्वर आणि शिमला यांसारख्या भागांमध्ये १० रुपयांच्या प्लास्टिक नोटांची चाचणीही केली गेली होती. मात्र, एटीएम आणि वेंडिंग मशिन्सच्या बाबतीत काही गंभीर समस्या उद्भवल्या आणि ज्यामुळे हा उपक्रम बंद करावा लागला होता.
पॉलीमर करंसी, पॉलीमर बँकनोट कापसाऐवजी पातळ आणि लवचिक प्लास्टिकच्या सबस्ट्रेटपासून बनवले जातात. या नोटांच्या निर्मितीसाठी ‘ Bi-axially Oriented Polypropylene (BOPP) चा वापर केला जातो. पॉलिमर नोटा कार्डसारख्या कडक नसतात; त्या कागदी नोटांसारख्याच दुमडल्या जाऊ शकतात.
कागदी चलनापेक्षा पॉलिमर किंवा प्लास्टिकच्या नोटा अधिक टिकाऊ असतात.
पॉलिमर चलनावर धूळ आणि ओलाव्याचा परिणाम कमी होतो.
पॉलिमर चलनाचे आयुष्य अधिक असल्याने नोटा वारंवार पुन्हा छापण्याची गरज कमी होते.
भारतात या चलनाचा वापर सुरू करणे ही काही नवीन गोष्ट नसेल. पॉलिमर चलनाचा वापर करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश होता. त्यानंतर कॅनडा, युनायटेड किंगडम, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया आणि रोमानिया या देशांनीही पॉलिमर चलनाचा वापर करण्यास सुरुवात केली.
RBI च्या अंदाजामुळे सर्वसामान्यांना फटका! महागाई वाढणार, विकासदर घटणार; नेमका काय परिणाम होणार?






