फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Highest Paid SC Judges: जगातील कोणत्या देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सर्वाधिक पगार मिळतो? सर्व देशांमध्ये न्यायाधीशाचे वेतन हे त्या देशाची अर्थव्यवस्था, राहणीमानाचा खर्च, न्यायव्यवस्थेची भूमिका आणि सरकारी धोरणांवर अवलंबून असते. न्यायिक पद हे केवळ हे उत्पन्नाचे साधन नसून ते एखाद्या देशाच्या न्यायव्यवस्थेचे प्राधान्य आणि तिथली आर्थिक स्थिती देखील दर्शवते. म्हणून आज आपण अशा देशांबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सर्वाधिक पगार मिळतो.’या’ देशातील सरन्यायाधिशांना मिळतो सर्वाधिक पगार
न्यायाधिशांना मिळणाऱ्या सर्वाधिक पगारांमध्ये अमेरिकेचे नाव सर्वात वर येते. त्यानंतर ब्रिटन आणि सिंगापूर या देशांमध्ये सर्वाधिक पगार न्यायाधिशांना दिला जातो. २०२५ च्या उपलब्ध आकडेवारीनुसार, अमेरिकेत न्यायाधिशांना सुमारे २,८५,००० ते ३,१५,००० डॉलर्स दिले जातात. सिंगापूरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनाही ५,००,००० ते ८,००,००० सिंगापूर डॉलर्स (SGD)च्या दरम्यान पगार मिळतो. तसेच यासोबत बोनस आणि इतर भत्त्यांचाही लाभ मिळतो. तर दुसरीकडे ब्रिटनमध्ये हा पगार २,२०,००० ते २,६०,००० पौंड (£) इतका आहे. मूळ वेतनाचा विचार केला तर अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना सर्वाधिक पगार मिळतो.
भारतात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना (Supreme Court) दरमहा २,५०,००० लाख हजार रुपयांपर्यंत पगार मिळतो. याशिवाय घरभाडे भत्ता हा मूळ वेतनाच्या २४ टक्के, फर्निशनिंग अलाउन्स म्हणून ८ लाख रुपये, सत्कार भत्ता म्हणून ३४,००० रुपये तर ग्रॅच्युइटी सुरक्षा म्हणून २० लाख रुपये आणि पेन्शन १५ लाख रुपये मिळतात.
भारताच्या सरन्यायाधीशांना(Chief Justice of India) दरमहा २,८०,००० रुपये पगार मिळतो. याशिवाय, पगाराच्या २४ टक्के घरभाडे भत्ता आणि दरमहा ४५,००० रुपये सत्कार भत्ता दिला जातो. तसेच १० लाख रुपये फिर्निशिंग भत्ता आणि पेन्शन म्हणून वार्षिक १६ लाख ८० हजार रुपयांसह महागाई भत्ता दिला जाते. याव्यतिरिक्त ग्रॅच्युइटी सुरक्षा म्हणून २० लाख रुपये मिळतात.






