LLB CET Result 2026 : तीन वर्षीय लॉ CET चा निकाल जाहीर; ४ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल गुण मिळवत मारली बाजी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत; राज्यभरात 12 हजारहून अधिक जागा रिक्त
तीन वर्षीय विधी सीईटी प्रवेश परीक्षा दि. १ आणि २ एप्रिल २०२६ रोजी दोन दिवसात चार सत्रात घेण्यात आली. या सीईटी परीक्षेला एकूण ८३ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सीईटी परीक्षेत चार सत्रात मिळून ६९ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये ४५ हजार १११ विद्यार्थी, २४ हजार ३५८ विद्यार्थिनी होत्या तर ४ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. याला ८३.२१% विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
हि सीईटी परीक्षा राज्यातील ६७ हजार ९४९ तर राज्याबाहेरील १५२४ विद्यार्थ्यांनी दिली. हि सीईटी परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्यातील १५६ परीक्षा केंद्रावर संगणकाधारित पद्धतीने घेण्यात आली होती. यावर्षी महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर सीईटी परीक्षा घेण्यात आली नाही.
विधी सीईटीमध्ये ४ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. राज्यातील मुंबई उपनगरातील अमेय विश्वेश राजगुरू आणि ठाणे येथील जीत संजय बर्दापूरकर या दोन विद्यार्थ्यांनी तर पूर्व दिल्लीतील अक्षत भारद्वाज आणि राजस्थानमधील सीकर येथील मोहम्मद रिजवान या राज्याबाहेर विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये १०० पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत.
खुला प्रवर्ग पर्सेंटाईल






