(फोटो सौजन्य: Pinterest)
मॉडेल कसे काम करते?
आयआयटी मुंबईचे डॉ. कशिश साधवानी आणि प्रा. टी. आय. एल्दो यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आलेली ही दुहेरी मशीन लर्निंग प्रणाली उपग्रहावरील सेंटिनेल-१ रडार डेटा, जमिनीची समुद्रसपाटीपासूनची उंची आणि भौगोलिक माहितीचा वापर करून ३० मीटर रिझोल्यूशनवर तब्बल ९३ टक्के अचूकतेने पूरप्रवण क्षेत्रांची ओळख करू शकते. -विशेष म्हणजे ही प्रणाली केवळ पूराचा इशारा देत नाही, तर त्या ठिकाणी पाणी किती खोलीपर्यंत साचेल, याचाही अंदाज वर्तवते, त्यामुळे बचावकार्य, नागरिकांचे स्थलांतर, रुग्णालये, शाळा आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण, यासाठी प्रशासनाला वेळेत निर्णय घेणे शक्य होणार आहे. पूराचा अंदाज बांधण्यासाठी केवळ पावसाचे प्रमाण हा निकष पुरेसा नसून, जमिनीवरून वाहणारे पृष्ठभाग वाह हा अधिक निर्णायक घटक आहे.
महत्त्वाचे शस्त्र ठरणार
सध्या हे मॉडेल दक्षिण भारतातील पश्चिम घाट आणि किनारी भागांसाठी विकसित करण्यात आले असले, तरी आवश्यक पुनर्प्रशिक्षण आणि स्थानिक भौगोलिक घटकांचा समावेश केल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रातील पूरप्रवण भागांसाठीही ते प्रभावीपणे वापरता येऊ शकते, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक पुन्हा सुरू; दरड हटवल्यानंतर वाहतुकीला हिरवा कंदील
एआय आधारित दुहेरी मशीन लर्निंग प्रणाली विकसित.






