फोटो सौजन्य -सोशल मीडिया
RRB Technician Recruitment 2026: भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. रेल्वे भरती बोर्डाची (RRB) ‘टेक्निशियन भरती २०२६’ साठीची अर्ज प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांच्याकडे आता फारसा वेळ उरलेला नाही. शेवटच्या क्षणी वेबसाईटवर येणाऱ्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ६,५५७ पदे भरली जाणार आहेत, ज्यामध्ये टेक्निशियन ग्रेड-१ आणि टेक्निशियन ग्रेड-३ या पदांचा समावेश आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारतीय रेल्वेच्या विविध झोन आणि उत्पादन युनिट्समध्ये केली जाईल.
आरआरबीने जारी केलेल्या भरती अधिसूचनेनुसार, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जुलै २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. मुदतीनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता वेळेत अर्ज भरावा.
टेक्निशियन ग्रेड-१ : संबंधित अभियांत्रिकी विषयात पदवी किंवा डिप्लोमा/डिग्री असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
टेक्निशियन ग्रेड-३: मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा समकक्ष पात्रता असलेले उमेदवार पात्र आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित RRB च्या अधिकृत अधिसूचनेमधील शैक्षणिक अटी काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात.
वयोमर्यादा: पदानुसार किमान वय १८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. कमाल वयोमर्यादा वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्याधेत सवलत दिली जाईल.
उमेदवारांची निवड अनेक टप्प्यांत केली जाईल, ज्यामध्ये संगणक आधारित परीक्षा (CBT), कागदपत्र पडताळणी (Document Verification), वैद्यकीय तपासणी (Medical Test) या टप्प्यांचा समावेश असेल.
सामान्य, OBC आणि EWS प्रवर्ग: ५०० रुपये
SC, ST, महिला, दिव्यांग, ट्रान्सजेंडर, EBC आणि माजी सैनिक: २५० रुपये
१. सर्वप्रथम संबंधित RRB च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
२. त्यानंतर ‘Technician Recruitment 2026’ या लिंकवर क्लिक करा.
३. नवीन नोंदणी केल्यानंतर लॉगिन करा आणि अर्ज फॉर्म ओपन करा.
४. अर्जात सर्व आवश्यक माहिती भरा आणि महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करा.
५. अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआऊट सुरक्षित काढून ठेवा.






