फोटो सौजन्य- सोशल मीडिया
पुनरपरीक्षेच्या (Re-Exam) तारखेची ही अधिसूचना एसएससीच्या दक्षिण विभागाने (SSC Southern Region) जारी केली आहे. यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, कॉन्स्टेबल (जीडी), सीएपीएफ (CAPF), एसएसएफ (SSF) आणि आसाम रायफल्स परीक्षा २०२६ अंतर्गत काही ठराविक परीक्षा केंद्रावरील काही विशिष्ट उमेद्वारांसाठी ही पुनरपरीक्षा आयोजित केली जाईल.
कर्मचारी चयन आयोगाच्या अधिसूचनेनुसार २९ मे २०२६ रोजी एसएससी जीडी कॉन्स्टेबलची पुनरपरिक्षा घेतली जाईल. निवडक परीक्षा केंद्रावरच या परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. २९ मे रोजी होणारी परीक्षा सर्वच उमेद्वारांसाठी नसून तांत्रिक कारणांमुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे.
एसएससीच्या दक्षिण विभागाने या रीएग्जामची तारीख जाहीर केली असून ही परीक्षा कोणत्या उमेद्वारांसाठी आयोजित केली जात आहे, याची माहिती उमेदवार त्यांच्या ‘SSC Login’ मध्ये जाऊन मिळवू शकतात.
२९ मे रोजी आयोजित होणाऱ्या जीडी परीक्षेसाठी परीक्षा शहर (Exam City) आणि प्रवेशपत्र (Admit Card) लवकरच उपलब्ध करून दिले जाईल. यासाठी विद्यार्थ्यांनी एसएससीच्या अधिकृत वेबसाईटवर (Official Website) लक्ष ठेवावे कारण लवकरच आयोगातर्फे (Email) किंवा एसएमएस (SMS) द्वारे देखील पुनरपरीक्षेचा सविस्तर तपशील आणि प्रवेशपत्राची माहिती दिली जाऊ शकते.






