संग्रहित फोटो
शिक्रापूर : करंदी (ता. शिरुर) येथील एका अल्पवयीन तरुणीचे अपहरण करुन अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या तरुणासह त्याला मदत करणाऱ्यालाही अटक केली आहे. मुंजाजी कामाजी कदम (वय.२१ वर्षे रा. पेठ पिंपळगाव जि. परभणी) आणि ज्ञानेश्वर छत्रपती कदम (वय. २३ वर्षे रा. सुन्ना जि. परभणी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, करंदी (ता. शिरुर) येथील एका पंधरा वर्षीय तरुणीचे दहा दिवसांपूर्वी अपरहण झाल्याबाबत तरुणीच्या आई- वडिलांनी शिक्रापूर पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी सदर घटनेचा तपास सुरु केला असता तरुणी परभणी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यांनतर पोलिसांनी परभणी येथे जात तरुणीसह दोघांना ताब्यात घेतले.
घटनेनंतर तरुणीकडे तपास केला असता मुंजाजीसह ज्ञानेश्वर यांनी करंदी येथे येऊन मुंजाजी याने माझ्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून मला परभणी नेले. तिथे नेल्यानंतर अत्याचार केल्याचे तरुणीने सांगितले, दरम्यान पोलिसांनी मुंजाजी व त्याच्या साथीदारावर पोक्सोसह अपहरण प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. या दोघांना अटक केली असून पुढील पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करत आहेत.