बोगस डॉक्टरांविरोधात पालिकेचा दणका (फोटो- सोशल मिडिया)
पुण्यात बोगस डॉक्टरांविरोधात पालिकेचा दणका
गेल्या १३ वर्षांत ५६ गुन्हे दाखल
वैद्यकीय व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल
पुणे: पुणे महानगरपालिकेने शहरातील बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरोधात कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून २०१३ ते २०२६ या कालावधीत विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच कोंढवा परिसरातील एका संशयित बोगस वैद्यकीय व्यावसायिकाविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला असून अशा प्रकरणांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध व कारवाई समितीची २२ वी बैठक झाली. बैठकीत शहरात करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. आरोग्य विभाग, विधी विभाग, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत यापूर्वी दाखल झालेल्या ५६ गुन्ह्यांच्या न्यायालयीन स्थितीचा आढावा घेण्याबरोबरच संबंधित ठिकाणी पुन्हा बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय सुरू आहे का, याची अद्ययावत माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांमध्ये बोगस डॉक्टरांविषयी जनजागृती करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. पालिकेकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे केम्स दारा वाडिया (केडीएम) या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
महानगरपालिकेने नागरिकांना वैद्यकीय उपचार घेण्यापूर्वी संबंधित डॉक्टरांची वैधानिक नोंदणी व शैक्षणिक पात्रता तपासण्याचे आवाहन केले आहे. बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींबाबत माहिती असल्यास ती महापालिकेच्या आरोग्य विभागाला किंवा संबंधित क्षेत्रीय कार्यालयाला कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. बोगस वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन आणि संबंधित शासकीय यंत्रणांच्या समन्वयाने पुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
Crime News : बोगस डॉक्टरला खामगाव येथून ठोकल्या बेड्या; यवत पोलिसांची मोठी कारवाई
बोगस डॉक्टरांचा होणार गेम
नागरिकांना अधिकृत आणि नोंदणीकृत डॉक्टरांची ओळख पटवता यावी यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी विधानसभेत माहिती दिली की, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने ‘नो युवर डॉक्टर’ नावाची क्यूआर (QR) कोड-आधारित प्रणाली सुरू केली आहे. या क्यूआर कोड स्कॅन करून, नागरिक संबंधित डॉक्टरची कायदेशीर नोंदणी झाली आहे की नाही, याची त्व






