संग्रहित फोटो
सोलापूर : सोलापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. झेडपी मुख्यालयातील आरोग्य विभागात कार्यरत असणारे आरोग्य सहाय्यक गणेश शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयातील शिपाई बिरुप्पा सखाराम वाघमारे यांना व्याजाचे पैसे का देत नाही म्हणून कार्यालयात मारहाण करून हाताची बोटे फ्रॅक्चर केल्याची घटना घडली आहे. याबाबत जखमी शिपाई बिरुप्पा वाघमारे यांनी मंद्रुप पोलिस स्टेशनसह, पोलिस अधिक्षक, सीईओ, आरोग्यधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार बिरुप्पा वाघमारे आणि गणेश शिंदे आरोग्य विभागात शासकीय सेवेत आहेत. २०२३ सालात बिरुप्पा वाघमारे यांनी गणेश शिंदे यांच्याकडून २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. दोन डि. सी.सी. बँकेचे व बॅंक ऑफ इंडियाचे दोन कोरे चेक तसेच 100/100 रुपये कोरे स्टॅम्प दिले होते. पहिल्या महीन्यात 10 टक्के व्याज घेतले नंतरच्या वेळी 20 टक्के व्याज मागण्यास सुरुवात केली.
हे सुद्धा वाचा : वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणूक; तब्बल 40 लाखांना घातला गंडा
वाघमारे यांनी तक्रारीत काय आरोप केलेत?
तसेच शिंदे वरिष्ठ असल्याने मी काही नाही बोलता दरमहिना 10 टक्के व्याज दिले परंतु, आता माझ्याकडे 1,50,000/- रुपये व्याजाचे झाले म्हणून तसेच सदरचे पैसे नाही दिलास तर तुझ्या कामातील रेकॉर्ड खराब करेन तसेच तुला खोट्या गुन्हाखाली अटक करेन, मी खासदाराचा माणूस आहे. तुला काय करायचे ते कर, तुझे संपुर्ण जिवन माझ्या हातात आहे. तुझे संपुर्ण जिवन उध्दवस्त करुन टाकतो, असे म्हणून दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 10 च्या सुमारास मी कामावर असताना मला कॅबीन मध्ये बोलवूनन घेऊन माझा उजवा हात फिरगाळून मला बेदम मारहाण केली तसेच तु जर माझे पैसे मला परत नाही दिले तर नौकरी कसा करतो ते मी बघतो म्हणून मला बेदम मारहाण करुन माझा मोबाईल काढून घेतला. ऑफिस स्टॉप मध्ये सर्व ऑफिस पधील कर्मचारी सदरचा इसम हा उच्च अधिकारी असल्यामुळे मला मारताना पाहत बसले. असे तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात गणेश शिंदे यांनी तक्रारीत तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
कार्यालयात मारहाण झाल्याची घटना घडल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. दोघाही कर्मचाऱ्यांना नोटीसा काढण्यात आल्या आह .चौकशीत तथ्य आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
– डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्यधिकारी (झेडपी)
हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांची दहशत; हडपसरमध्ये महिलेला चाकूच्या धाकाने लुटले