Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला; जळगावातील गूढ मृत्यूने खळबळ
काय घडलं नेमकं?
शाहगंज परिसरात रात्रीची वर्दळ असतांना संशयित रिक्षाचालकाने चिमुकलीला १०० रुपयांचे आमिष दाखवून तिचे तोंड दाबले, आणि त्यांनतर जबरदस्तीने रिक्षात टाकून भरधाव वेगाने पळ काढला. हा सर्व प्रकार परिसरातील तीन जागरूक नागरिकांच्या निदर्शनास आला. काहीतरी गैरप्रकार घडत असल्याचे लक्षात येताच, या तिघांनीही कसलाही विचार न करता तात्काळ स्वतःच्या वाहनाने रिक्षाचा पाठलाग सुरू केला. आपला पाठलाग केला जात असल्याचे लक्षात येताच घाबरलेल्या संशयिताने रिक्षा थेट जिल्हाधिकारी कार्यालय परिसराच्या दिशेने वळवली. पाठलाग तीव्र झाल्यानंतर रजिस्ट्री कार्यालयाजवळ चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा रस्त्यालगतच्या नालीत जाऊन अडकली.
रिक्षा अडकली आणि…
रिक्षा अडकताच नागरिक जवळ येऊ लागले. नागरिक जवळ पोहोचल्याचे लक्षात येताच, संशयिताने चिमुकलीला तिथेच सोडले आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. घटना घडल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. सिटी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली आहे. पोलीस सध्या अज्ञात संशयितांचा कसून शोध घेत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोषागार कार्यालय परिसर रात्रीच्या वेळी अत्यंत निर्जन असतो. त्यामुळे संशयिताचा नक्की उद्देश काय होता, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. या संपूर्ण थरारात आपल्या जीवाची पर्वा न करता बालकेचा जीव वाचवणाऱ्या त्या तीन धाडसी नागरिकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
धक्कादायक ! AI ची मदत घेऊन तिहेरी हत्याकांड; बंगळुरू पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा
Ans: छत्रपती संभाजीनगरच्या शाहगंज परिसरात.
Ans: तीन जागरूक नागरिकांनी रिक्षाचा पाठलाग करून तिची सुटका केली.
Ans: गुन्ह्यातील रिक्षा जप्त करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.






