ही घटना अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील आहे. पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार तिला एक मुलगा त्रास देत होता. सतत तिच्याकडे ते वाईट नजरेने पाहायचा. हा सर्व प्रकार तिने तिच्या आई वडिलांना सांगितला. तिच्या पालकांनी तिला पोलीसात तक्रार दाखल करण्यास सांगितलं पण मुलीने नकार दिला. शेवटी रागाच्या भरात पालकांनी टोकाचं पाऊल उचललं. रागाच्या भरात स्वत:च्या मुलीचे केस कापून तिचं टक्कल केलं. हा मानसिक त्रास सहन न झाल्याने शेवटी या मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेला सगळा प्रकार तिने पोलीसांना सांगितला आणि पालकांनी केलेल्या मानसिक जाचामुळे तक्रार देखील दाखल केली.
एवढंच नाही तर वरुड येथील मुलीवर तिची आई आणि सावत्र बापाने संशय घेऊन मारण्याची धमकी आणि शिवीगाळ केली. आता आम्ही तिला बालनिरीक्षक गृहात पाठवले आहे. मुलीवर संशय घेत तिच्या आईने आणि सावत्र बापाने पट्ट्याने मारहाण केली आहे इलेक्ट्रॉनिक स्ट्रिमर मशीनने तिचे केस कापले असल्याचं प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल जाधव यांनी सांगितला आहे.
सध्या सदर मुलगी ही आई वडिलाला सोडून आता महिला बालकल्याण समितीच्या देखरेखीखाली आहे. तिचं समुपदेशन या ठिकाणी केला जात आहे. या मुलीला पालकांनी विद्रुप केल असून तिला आई-वडिलाकडे जायचं नाही असं महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांनी सांगितलं. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आाता तर मुली फक्त बाहेरच नाही तर घरात देखील सुरक्षित नाही. छेडछाडीच्या प्रकरणात
मुलींना मानसिका आधार आणि हिंमत देण्याऐवजी त्यांच्यावरच बंधने आणि शिक्षा लादण्याची मानसिकता अजूनही समाजात का आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.






