भाईंदर/ विजय काते : दिवसेंदिवस शहरात मोठ्या प्रमाणात अंंमली पदार्थाचे रॅकेट उघड होत आहे. कधी गांजाची तस्करी तर ड्रग्ज शहारात गुन्हेगारी वाढत जात असवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. .यापार्श्वभूमाीवर आता अंमली पदार्थ विक्रीविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेत नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कारवाई करत 251ग्रॅम वजनाचा एम.डी. मॅफेड्रॉन हा तब्बल1,255,000 रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी साहिल विजय सिंग या 20 वर्षीय तरुणाला मीरारोड येथून पोलीसांनी अटक केलीआली आहे. ही कारवाई दि.2 सप्टेंबर रोजी भाईंदर पूर्व येथील नवघर फाटक सबवे जवळ करण्यात आली. काळा शर्ट व काळी पॅन्ट घालून संशयास्पद हालचाली करत असलेला आरोपी पोलिसांना दिसताच त्याला ताब्यात घेण्यात आले. तपासणीदरम्यान आरोपीकड़े .डी. मॅफेड्रॉनचा मोठा साठा सापडला आहे.
या कारवाईनंतर नवघर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गु.र.नं. 409/2025भादंवि नोंदवला असून, त्याच्यावर एन.डी.पी.एस. कायदा 1985चे कलम 8(क), 22(क), 29अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अमोल तळेकर करीत आहेत. ही धडक मोहीम मा. निकेत कौशिक (पोलीस आयुक्त), मा. दत्तात्रय शिंदे (अपर पोलीस आयुक्त), मा. राहुल चव्हाण (पोलीस उपायुक्त परिमंडळ-1), मा. सोहेल शेख (सहा. पोलीस आयुक्त, नवघर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
याआधी देखील चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या शेतात गांजाची शेती केल्याच उघड झालं. मीरारोड येथे कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने लातूरला त्याच्या गावी गांजाची शेती केल्याचं काही महिन्यांपूर्वी उघड झालं होतं. तपासात उघड झालेल्या माहितीप्रमाणे, लातूर जिल्ह्यातील या फॅक्टरीत तयार होणारे ड्रग्ज मुंबई, मिरारोड आणि वसई-विरार परिसरात वितरित केले जात होते.तपासाअंती हटकेश भागातून ‘मुद्दू’ नावाच्या वितरकाला ताब्यात घेतलं.
या नेटवर्कमध्ये आणखी लोकांचा सहभाग असल्याची शक्यता असून, DRI आणि पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा देखील यात सहभाग असण्याची शक्यता सांगितली होती. गुन्ह्यातील सातही आरोपींना नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायदा (NDPS Act), 1985 अंतर्गत अटक करण्यात आली. या कायद्यानुसार अंमली पदार्थांचे उत्पादन, बाळगणे, विक्री व सेवन यावर कडक बंदी आहे. त्य़ामुळे या सगळ्यावर कडक कारवाई देखील करण्यात आली.देशातल्या कायदा रक्षकांनीच जर कायदा मोडायला सुरुवात केली, तर समाजात गुन्हेगारीला खतपाणी मिळते. मात्र महसूल गुप्तचर संचालनालयाच्या या धाडसी कारवाईमुळे एक मोठे ड्रग्ज सिंडिकेट उद्ध्वस्त झाले. दिवसेंदिवस होत असलेल्या अंमली पादर्थांच्या तस्करी आणि विक्रीमुळे शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असल्याचं दिसून येत आहे.