तळोजा तुरुंगात लॉरेन्स बिश्नोईच्या गुंडावर क्रूर अत्याचार, भावाचा गंभीर आरोप
सावन वैश्य, नवी मुंबई : लॉरेन्स बिश्नोई गँगची दहशत कायम आहे. अशातच आता तळोजा मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गुंड हरपाल सिंग उर्फ हॅरियर नावाच्या कैद्यावर तुरुंग प्रशासनाने अमानुष छळ केल्याचा आरोप हरपाल सिंगच्या भावाने केला आहे. माध्यमांशी बोलताना हरपाल सिंगच्या भावाने सांगितले की, त्याच्या भावाला आत खुर्चीला बांधून बेदम मारहाण केली जात आहे. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, तुरुंगात तैनात असलेला कदम नावाचा एक अधिकारी हरपाल सिंगकडून पैशाची मागणी करत होता. हरपालने पैसे देण्यास नकार दिल्यावर, तेव्हापासून त्याचा सतत छळ केला जात आहे. असा आरोप आहे की त्याचा केवळ मानसिकच नाही तर शारीरिक छळही केला जात असल्याचं हरपाल सिंग याचं म्हणणं आहे. तसेच आरोपी गुरपाल सिंग उर्फ हॅरियर हा सलमान खानच्या फार्म हाऊस वर फायरिंग करणाऱ्या आरोपीचा भाऊ असल्याची माहिती मिळत आहे.
हरपाल सिंगच्या भावाने सांगितले की, ही माहिती त्याला एका तरुणाने दिली होती. जो अलीकडेच न्यायालयात सापडला होता आणि त्याच तुरुंगात होता. तरुणाने सांगितले की, हरपाल अतिशय कठीण परिस्थितीत आहे, आणि त्याला सतत छळ सहन करावा लागत आहे. कुटुंबाने प्रशासनाकडे मागणी केली आहे की हरपाल सिंगला सुरक्षित घरात किंवा सुरक्षित कोठडीत स्थानांतरित करावे आणि तुरुंग अधिकाऱ्यांविरुद्ध योग्य चौकशी सुरू करावी. त्यांनी महाराष्ट्र मानवाधिकार आयोग आणि उच्च न्यायालयाकडे हस्तक्षेपासाठी अपील देखील केले आहे. या प्रकरणात अद्याप तुरुंग प्रशासनाकडून कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही. परंतु जर केलेले आरोप खरे असल्याचे आढळले तर हे केवळ गंभीर मानवी हक्क उल्लंघनाचे प्रकरणच नाही तर तुरुंग व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करेल. आरोपी गुरपाल सिंग उर्फ हॅरियर हा सलमान खानच्या फार्म हाऊस वर फायरिंग करणाऱ्या आरोपीचा भाऊ असल्याची माहिती मिळत आहे.
तसेच दोन दिवसांपूर्वी राजस्थान पोलिसांनी आग्रा येथील बाह परिसरातून लॉरेन्स विश्नोई टोळीच्या एका सदस्याला अटक केली आहे. आरोपीने श्री गंगानगर येथील त्याच्या एका साथीदारासह तेथील एका प्रतिष्ठित व्यावसायिकावर गोळीबार केला होता. यापूर्वी, टोळीतील सदस्यांनी व्यावसायिकाकडून चौथची मागणी केली होती. घटनेपासून राजस्थान पोलिस आरोपीचा शोध घेत होते. राजस्थानातील श्री गंगानगरमध्ये, लॉरेन्स विश्नोई टोळीतील सदस्यांनी काही काळापूर्वी एका व्यावसायिकाकडून पाच कोटी रुपयांची चौथची मागणी केली होती. चौथ न दिल्याने, टोळीतील सदस्यांनी व्यावसायिकावर गोळीबार केला. या प्रकरणात, शनिवारी रात्री राजस्थान पोलिसांनी बाह येथील महानगर नगर पक्की तलैया येथील रहिवासी गोलू उर्फ मंतन याला अटक केली.