काय घडलं नेमकं?
गावातील १३ महिला दररोज प्रमाणे पहाटे तेंदु पत्ता संक्रानासाठी गुंजेवाही जंगलात गेल्या होत्या. जंगलात तेंडू पत्ता गोळा करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी तातडीने जंगल परिसरात धाव घेतली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदर हल्ला एकाच वाघाने केला की परिसरत आणखी वाघ आहेत, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाहीये. मात्र या हल्ल्यामागे ब्रह्मपुरी येथील 47 अंश सेल्सिअस पर्यंत वाढलेले तापमान हे देखील एक कारण असू शकतं, असं तज्ञांना वाटतं.
आंदेकर टोळीकडून वनराजच्या खुनातील आरोपींचे नातेवाईक टार्गेट; पोलीस यंत्रणेपुढे मोठे आव्हान
कारण वाघांना उन्हाचा प्रचंड त्रास होतो. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी ते पाण्यात असतात. मात्र त्याक्षणी वाघाला शरीराचे तापमान कमी करण्यासाठी पाणी मिळाले नसल्याने वागावर मानसिकतान व चिडचिडेपणा वाढला असावा. त्यामुळे त्यांनी महिलांवर हल्ला केला असावा असे तज्ञांना वाटत आहे.
घडलेली घटना हि पहिलीच
वाघाच्या हल्ल्याची ही घटना गुंजेवाही-पवनपार या मार्गावर असलेल्या खैरीचक परिसरातील जंगलात घडली असून सर्व महिला या गुंजेवाही या गावातील रहिवासी आहे. त्या सर्व महिला भट्टी मोहल्ला वॉर्ड क्रमांक 1 येथे राहतात. हा असा हल्ला पहिलाच असल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलांचे नावे अशी
कवडूबाई दादाजी मोहुर्ले (वय ४५)
अनिता बाई दादाजी मोहुर्ले (वय ४०)
संगीता संतोष चौधरी ( वय ५०)
सुनिता कौशिक मोहुर्ले ( वय ३५)
ही निव्वळ दुर्घटना नाही, तर…
दरम्यान, याच मुद्दयांवर बोट ठेवत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या चार निष्पाप भगिनींचा वाघिणीच्या हल्ल्यात झालेला मृत्यू ही निव्वळ दुर्घटना नाही, तर तो प्रशासकीय अनास्थेने केलेला घात आहे! हे सरकार नक्की झोपलंय कुठे? असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
सरकार आणि वन विभाग अजूनही कुंभकर्णासारखे झोपेत
ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी जनता पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलात जाते. त्यांना सुरक्षा देणे हे वन विभागाचे आणि सरकारचे कर्तव्य नाही का? वाघ-मानव संघर्ष काही आज नवीन नाही. रोज कुठे ना कुठे हल्ले होत आहेत, निष्पाप गरिबांचे बळी जात आहेत, पण सरकार आणि वन विभाग अजूनही कुंभकर्णासारखे झोपेत आहे. जंगलावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने कोणती ठोस पावले उचलली? ॲक्शन प्लॅन कुठे आहे? वन विभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
कष्टकऱ्यांच्या जिवाची किंमत शून्य का?
अधिकारी फक्त वातानुकूलित केबिनमध्ये बसून बैठका मारणार की प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काही काम करणार? कष्टकऱ्यांच्या जिवाची किंमत शून्य का? जर एखादा वाघ मारला गेला तर लगेच चौकशी समित्या बसतात, पण एकाच वेळी ४ गरीब महिलांचे बळी जातात तेव्हा प्रशासन एवढं सुस्त कसं राहू शकतं? ग्रामीण भागातील जनतेने स्वतःचा जीव मुठीत धरून किती दिवस जगायचं? सरकारने आमच्या संयमाचा अंत पाहू नये! असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
Twisha Sharma Case: ट्विशाच्या पतीला जबलपूरमध्ये अटक; हायकोर्टाने दिले ‘हे’ आदेश
Ans: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही-पवनपार जंगलात घटना घडली.
Ans: तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या असताना हल्ला झाला.
Ans: वाढते तापमान आणि पाण्याअभावी वाघ आक्रमक झाल्याची शक्यता व्यक्त केली.






