काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील पीडित ४० वर्षीय महिलेचा विवाह २०१० मध्ये जमीन खरेदी-विक्री व्यवसाय करणाऱ्या अमित बोरसे याच्याशी झाला होता. वैवाहिक आयुष्यात सातत्याने वाद होत असल्याने संबंधित महिला २०२२ मध्ये माहेरी राहण्यासाठी गेली होती. त्यानंतर दोन्ही कुटुंबियांच्या मध्यस्थी झाल्याने ती पुन्हा सासरी परतली. मात्र त्यानंतर पत्नीवर संशय घेणे, तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वाहनांमध्ये जीपीएस बसवणे तसेच नोकरी करण्यास विरोध करणे, असे प्रकार सुरू असल्याचे तिने तक्रारीत आरोप केले आहे.
८० लाख रुपयांची माहिती
व्यवसायात आर्थिक अडचणी निर्माण झाल्यानंतर अमित बोरसे यांनी वडिलांचे घर तारण ठेवून कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी पत्नीने माहेरकडून ८० लाख रुपये आणावेत, यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. याच कारणावरून वारंवार मारहाण देखील केल्याचे आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
वाढदिवसानंतर मारहाण आणि…
५ जून रोजी मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. मध्यरात्री केक कापल्यानंतर कुटुंबीय घरातच होते. त्यावेळी संबंधित महिला हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत असताना अमित बोरसे यांनी तिच्यावर अचानक हल्ला केला. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महिलेने कसाबसा प्रतिकार करत स्वतःची सुटका करून घेत शेजाऱ्यांच्या घरात आश्रय घेतला.
हा हल्ला महिलेच्या चेहऱ्यावर, डाव्या कानाला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली. या जखमांमुळे तिच्या दृष्टी आणि ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून उपनिरीक्षक अर्जुन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला अटक केली.
पिस्तूल पत्नीच्या कपाळावर रोखली…
काही दिवसांपूर्वी अमित बोरसे यांनी वडिलांकडे असलेले परवानाधारक पिस्तूल पत्नीच्या कपाळावर रोखून तिला घटस्फोट देण्याची धमकी दिली होती. घटस्फोटास नकार दिल्यास त्याच पिस्तूलाने ठार मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे. कुटुंबाची बदनामी होऊ नये या भीतीने महिलेने याबाबत यापूर्वी कुठेही तक्रार केली नव्हती. या प्रकरणाचा पुढील तपास पुंडलिकनगर पोलीस करत आहेत.
पाटस पोलिस ॲक्शन मोडवर; गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड
Ans: ही घटना छत्रपती संभाजीनगरातील एन-3 परिसरातील एका उच्चभ्रू वसाहतीत घडली.
Ans: माहेरहून 80 लाख रुपये आणण्यासाठी पत्नीवर दबाव टाकला जात होता.
Ans: पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपी अमित विनायक बोरसे याला अटक करून न्यायालयात हजर केले.






