(फोटो सौजन्य: Pinterest)
इंस्टाग्रामवर ओळख लपवली
ही कहाणी २०२१ मध्ये सुरु झाली जेव्हा आरोपी आपली खरी ओळख लपवून इंस्टाग्रामवर साहिल नावाने आपलं फेक अकाऊंट चालवत होता. त्याने सांगितले की, तो हिंदू कुटुंबातील एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती आहे. महिला त्याच्या जाळ्यात अडकली आणि त्याच्यांत संभाषण सुरु झालं. आरोपीने महिलेला लग्नाचे खोटे वचन दिले होते. घटनेने भीषण रुप २०२२ मध्ये घेतले जेव्हा आरीपद्वारे महिलेला दिल्लीच्या बाटला हाउसच्या परिसरात बोलावण्यात आले. तिथे गेल्यानंतर महिलेला त्याचे खरे रुप दिसले आणि समजलं की हा साहिल नसून फहिम आहे. यानंतर फहिमने काही साथीदारांच्या मदतीने महिलेला कैद करुन ठेवलं आणि तिच्यासोबत गँगरेप केला.
पिडितेने केली तक्रार
पिडितेने आपल्या तक्रारीत अशा काही गोष्टी उलगडल्या ज्या ऐकून सर्वांनाच धक्का बसला. तिने सांगितले की, फहिम आणि त्याचे नातेवाईक अवैध हत्यारांची तस्करी करतात. त्यांनी तिला ओलीस ठेवून तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले. इतकंच नाही तर तिला घाबरवून ठेवण्यासाठी तिच्या शरीरावर प्राण्यांचे रक्त देखील लावण्यात आले, तिच्या अंगावर मांसाचे तुकडे फेकण्यात आले. या सर्व गोष्टी करुन त्यांनी तिला घाबरवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तस्लीम नावाच्या माैलवीने महिलेचा छळ करुन जबरदस्तीने तिचे धर्मपरिवर्तन केले.
आपत्तिजनक व्हिडिओ शूट केला
महिलेचे शोषण करुन तिला मानसिक त्रास देऊन जेव्हा आरोपींच मन भरलं नाही तेव्हा त्यांनी तिचा अश्लिल व्हिडिओ देखील शूट केला. या व्हिडिओच्या जोरावर ते तिला ब्लॅकमेल करु लागले. आरोपींनी महिलेला मेरठ देखील घेऊन गेले, जिथे जाऊन तिच्यावर पुन्हा एकदा सामूहिक बलात्कार करण्यात आला. पिडितेने जेव्हा त्यांचा विरोध करु पाहिला तेव्हा आरोपींनी तिच्या लहान मुलीला मारुन टाकण्याची धमकी दिली. आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी महिलेृने २०२२ पासून ते २०२४ पर्यंत सर्व नरकयातना सहन केल्या.
Punjab Crime: अमृतसरमध्ये ड्युटीवर जाणाऱ्या ASIची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या; पंजाब पोलिसात खळबळ
आरोपीची दुसरी प्रकरणे समोर आली
घटनेत खरा ट्विस्ट हा २०२५ मध्ये आला जेव्हा दुसऱ्या काही प्रकरणांमध्ये फहीमला गुरुग्राम पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याचा फोन जप्त केला आणि यातच त्यांना पिडितेचा अश्लिल व्हिडिओ सापडला. पिडितेला जेव्हा समजले की तिचा व्हिडिओ डिलिट झाला आहे तेव्हा तिने हिम्मत करुन पोलिसांना सर्व गोष्ट सागंतली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, १४ मे २०२६ रोजी जामिया नगर पोलिस ठाण्यात पिडित महिलेने आपली FIR दाखल केली. आपल्या तक्रारीत तिने फहीम, खुर्शीद, जैद, अजीम, तालीम आणि नफीस अशा पाच जणांवर आरोप लावले. पोलिसांनी यात चार जणांना ताब्यात घेतलं असून एक आरोपी सध्या दुसऱ्या गुन्ह्यात मेरळ जेलमध्ये बंद आहे. माहितीनुसार, प्रोडक्शन वॉरंटवर पोलिस त्याला दिल्ली आणण्याची तयारी करत आहे.






