मुंबईच्या नालासोपाऱ्याच्या पूर्व मोरेगाव येथे इंस्टाग्रामवर मित्राच्या प्रेयसीला अश्लील मॅसेज पाठवल्याच्या रागातून मित्रांनीच मॉब लिंचिंग करत एक तरुणाची हत्या केल्याचं समोर आलं आहे. मृतकाचे नाव प्रतीक वाघे (वय 24) असे आहे तर भूषण पाटील हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. आरोपी हा व्यायाम पट्टू आहे.
नेमकं काय घडलं?
मृतक प्रतीक आणि आरोपी भूषण हे दोघेही तीन वर्षांपासून एकमेकांचे मित्र होते. दोघेही पूर्वी मीरारोडच्या भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करत होते. प्रतीक सध्या तेथेच कार्यरत होता. भूषण याने दोन वर्षांपूर्वी नौकरी सोडली होती. प्रतिकने भूषणच्या प्रेयसीला इंस्टाग्रामवर अश्लील मॅसेज पाठवल्यानंतर, भूषणने हा राग मनात धरला. 24 ऑगस्टच्या रात्री त्याने प्रतीकला मोरेगाव येथे बोलावून घेतले व ग्रुपसह बेदम मारहाण केली.
आरोपीनीचं व्हिडीओ काढून केला व्हायरल
मारहाणीचा व्हिडीओ आरोपीनीच काढला व सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाणीत प्रतीक गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेत प्रतीकला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याला इतकं मारलं होत की, तो अर्धमेला झाला होता. डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर उपचार सुरु केले. पण उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झाला. या घटनेननंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गैरकायद्याची मंडळी जमवून हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीचा प्रियकर भूषण पाटील, संकेत पाटील, स्वरूप मेहेर यांच्यासह 7 जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.
गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार, अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून केलं ब्लॅकमेल
मुंबईत एक धक्कदायक घटना घडल्याचे समोर आले आहे. वाढदिवसाच्या पार्टीत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेलही केल्याचा आरोप मुलीने तक्रारीत केला आहे. मागील दोन वर्षांपासून आरोपी मुलीला हे अश्लील व्हिडीओ फोटो दाखवून शारीरिक संबंध ठेवण्याबाबत जबरदस्ती करत होता. गोरेगावच्या रॉयल पॉम व्हिला, आरे कॉलनी येथे आयोजित केलेल्या पार्टीत आरोपीने हे पार्टीत आरोपीने हे कृत्य केल्याचे मुलीने तक्रारीत म्हंटले आहे.
नेमकं काय घडलं?
वाढदिवसाच्या पार्टीत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. अत्याचार केल्यानंतर मागील दोन वर्षांपासून आरोपी हा मुलीला हे अश्लील व्हिडीओ फोटो दाखवून शारीरिक संबंध ठेवण्याबाबत जबरदस्ती करत होता. मानसिक तणाव आणि रोजच्या त्रासाला कंटाळून
अखेर 17 वर्षीय मुलीने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अजिम रहिम खान यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत.
बियर आणायला सोबत न जाणं भोवलं; पुण्यात तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण