Maharashtra Breaking News Updates Today:
25 Apr 2026 10:10 AM (IST)
आज आधुनिक दळणवळण क्षेत्राचा पाया रचणारे महान इटालियन शास्त्रज्ञ गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्मदिवस आहे. त्यांना रेडिओचे जनक मानले जाते. १८७४ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी लांब अंतराच्या रेडिओ लहरींच्या मदतीने १८९५ मध्ये हवेतून एक संकेत पाठवला होता. वायरलेस संदेशवहनाचा शोध त्यांनी लावला होता. यामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एक नवी सुरुवात झाली होती. त्यांच्या या ऐतिहासिक कार्याबद्दल त्यांना १९०९ मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सध्याच्या तंत्रज्ञान टेलिव्हजन, वाय-फाय आणि मोबाईल तंत्रज्ञान हे मार्कोनी यांच्या मूळ सिद्धांतावरच आधारित आहे. त्यांच्या शोधामुळे समुद्रातील जहाजांशीही संपर्क साधणे देखील सुलभ झाले, ज्यामुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचवणे शक्य होते.
25 Apr 2026 09:59 AM (IST)
Honor Smartphone Launched: टेक कंपनी हॉनरने पुन्हा एकदा सर्व स्मार्टफोन कंपन्यांची झोप उडवली आहे. कंपनीने निवडक जागतिक बाजारात Honor 600 Pro आणि स्टँडर्ड Honor 600 हे दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. स्मार्टफोनची विशेषत: म्हणजेच त्यांचा कॅमेरा. यूजर्सचा फोटोग्राफी अनुभव अधिक चांगला व्हावा आणि डीएसएलआरला टक्कर देता यावी, यासाठी कंपनीने 200-मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह दोन्ही स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत सविस्तर जाणून घेऊया.
25 Apr 2026 09:50 AM (IST)
मध्य पूर्वेतील आखाती प्रदेशात (US-Israel Iran War) शांतता प्रस्थापित होण्याऐवजी तणाव अधिकच गडद होताना दिसत आहे. शुक्रवारी पहाटे कुवेतच्या उत्तर सीमेवर झालेल्या एका भीषण ड्रोन हल्ल्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. हा हल्ला केवळ लष्करी चौक्यांवरील प्रहार नसून, कुवेतच्या सार्वभौमत्वाला दिलेले थेट आव्हान मानले जात आहे. विशेष म्हणजे, हा हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान पाहून संरक्षण तज्ज्ञही चक्रावून गेले आहेत.
25 Apr 2026 09:40 AM (IST)
सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, जंगलाचा राजा आणि आणि राणी म्हणजेच सिंह आणि सिंहीण एका ठिकाणी एकत्र वेळ घालवत आहेत. इथे सिंहीण तर निवांत आराम करत असते पण सिंह मात्र आरामाच्या मूडमध्ये नसतो. तो हात जमिनीला टेकवून अगदी माणसांप्रमाणे पुश-अप्स करु लागतो. त्याला पाहून असं वाटतं की सिंह देखील आपल्या फिटनेसची काळजी घेत आहे. मुख्य म्हणजे यूजर्सचं काय तर मागे बसलेली सिंहीण देखील सिंहाला असं करताना पाहून थक्क होताना दिसून आली. व्हिडिओतील या दृष्यांना काही यूजर्सने एआय मानले आहे तर काही म्हणत आहेत की, सिंह शिकारीची तयारी करत असावा.
25 Apr 2026 09:30 AM (IST)
अमेरिकेने होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये केलेल्या कडक नाकेबंदीमुळे इराणची मोठी कोंडी झाली असून, इराणी बंदरातून जहाजांची ये-जा पूर्णपणे ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर इराणच्या शिष्टमंडळाने पाकिस्तानचा दौरा केला असून, अमेरिकेशी कोणतीही थेट चर्चा करणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. दुसरीकडे, जागतिक शांततेचे प्रयत्न सुरू असतानाच इस्रायलने लेबनॉनवर मोठा हल्ला केला आहे. इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात तीन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर झाला असला, तरी प्रत्यक्ष युद्धभूमीवर संघर्ष अद्याप सुरूच आहे. इस्रायली संरक्षण दलाने केलेल्या नवीन दाव्यामुळे या संपूर्ण क्षेत्रात पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे.
25 Apr 2026 09:25 AM (IST)
आमदार संजय गायकवाड यांच्या धमकी प्रकरणाने वातावरण तापलेले असतानाच, आता बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी, "शिवाजी महाराज युद्ध करताना थकले होते आणि त्यांनी समर्थ रामदास स्वामींकडे राज्य सांभाळण्यास सांगितले होते," असे ऐतिहासिक संदर्भांना फाटा देणारे विधान केले. महाराजांच्या शौर्याचा आणि कर्तृत्वाचा अपमान करणारी ही विधाने समोर आल्यानंतर शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गायकवाड प्रकरणापाठोपाठ आता बागेश्वर बाबांच्या या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
25 Apr 2026 09:20 AM (IST)
नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर आता सोलापूर पोलिसांनी स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवून घेणाऱ्या मनोहर भोसले ऊर्फ मनोहर मामाला बेड्या ठोकल्या आहेत. भविष्य बदलण्याचे आमिष दाखवून भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याचा ताजा आरोप त्याच्यावर आहे. धक्कादायक म्हणजे, मनोहर मामावर यापूर्वीच बलात्कार, भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीसारखे तीन गंभीर गुन्हे दाखल असून तो जामिनावर बाहेर होता. जुन्या प्रकरणांतून धडा न घेता पुन्हा एकदा फसवणुकीचा धंदा सुरू ठेवल्याने पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून, भोंदूगिरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
25 Apr 2026 09:15 AM (IST)
बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी 'शिवाजी कोण होता?' पुस्तकाच्या प्रकाशकाला दिलेल्या धमकीचे प्रकरण ताजे असतानाच, आता त्यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कुणाल गायकवाड कारच्या बोनेटवर उभे राहून विरोधकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहेत. जरी हा व्हिडिओ नगरपरिषद निवडणुकीच्या काळातील असला, तरी तो पुन्हा प्रसारित झाल्याने बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कुणाल गायकवाड हे नगरपरिषदेचे सदस्य आणि गटनेते असून, बाप-लेकांच्या या अशा वर्तणुकीमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
25 Apr 2026 09:10 AM (IST)
विधान परिषदेच्या दहा जागांपैकी अजित पवार गटाच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. जागा एक आणि इच्छुक अनेक अशी स्थिती असल्याने, उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांनी विविध क्लृप्त्या लढवण्यास सुरुवात केली आहे. काही जण पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे शिष्टमंडळे पाठवून गळ घालत आहेत, तर काही जण अजित पवारांच्या जुन्या आश्वासनांचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करत आहेत. धक्कादायक म्हणजे, काही इच्छुकांनी थेट करोडो रुपयांचा पक्षनिधी देण्याची तयारी दर्शवली आहे, तर काहींनी 'एमएमडी' (मराठा, मुस्लिम, दलित) फॅक्टरचा दाखला देत दलित समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी लावून धरली आहे. या 'कांटे की टक्कर'मुळे पक्षनेतृत्व कोणाच्या गळ्यात माळ घालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
25 Apr 2026 09:05 AM (IST)
मणिपूरमधील उखरुल जिल्ह्यात हिंसाचाराचा वणवा पुन्हा एकदा पेटला असून, शुक्रवारी नागा आणि कुकी आदिवासी समुदायांच्या सशस्त्र गटांमध्ये झालेल्या भीषण गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला आहे. या हिंसक संघर्षात अनेक जण जखमी झाले असून संतप्त जमावाने मुल्लम गावातील अनेक घरांना आग लावली. म्यानमार आणि नागालँडच्या सीमेलगत असलेल्या या संवेदनशील भागात सुरक्षा दलांनी लष्करी गणवेशातील दोन मृतदेह ताब्यात घेतले असून, त्यांच्या शरीरावर गोळ्यांच्या खुणा आढळल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे.
25 Apr 2026 08:58 AM (IST)
आध्यात्मिक उपचारांच्या बहाण्याने महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित तांत्रिक अशोक खरातच्या पापांचा घडा आता भरला आहे. खरात विरोधात दाखल झालेल्या सहाव्या अत्याचार प्रकरणात नाशिक न्यायालयाने त्याला २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. श्रद्धेच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या खरातचे काळे कारनामे उघड झाल्याने शहरात खळबळ उडाली असून, विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्याच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा केले आहेत. या कारवाईमुळे पीडित महिलांना न्याय मिळण्याच्या आशा उंचावल्या आहेत.
25 Apr 2026 08:54 AM (IST)
आम आदमी पार्टीसाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत धक्कादायक ठरला. आप'चे नेते राघव चड्ढा यांच्यासह सात राज्यसभा खासदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये विलीन होण्याची घोषणा केली. अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय वर्चस्वाला बसलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा तडा मानला जात आहे. पण त्याचवेळी दिल्लीतही महाराष्ट्रातील शिंदे-पवार गटासारख्याच राजकीय खेळाची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येत आहे. या बंडामुळे 'आप'ची संसदेतील ताकद मोठ्या प्रमाणात घटली असून, सात खासदारांच्या या सामूहिक पक्षांतरामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हे केवळ पक्षांतर नसून केजरीवाल यांच्या नेतृत्वासमोर उभे राहिलेले मोठे आव्हान मानले जात आहे.
25 Apr 2026 08:48 AM (IST)
Gold Rate Today: भारतात 25 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,405 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,121 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,554 रुपये आहे. भारतात 25 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,41,210 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,54,050 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,15,540 रुपये आहे. भारतात 25 एप्रिल रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 259.80 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,59,900 रुपये आहे.
वॉशिंग्टन : अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून इराणवर दबाव टाकण्यासाठी हल्ले केले जात आहेत. याला इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. मात्र, या युद्धाला काही दिवसांचा युद्धविराम मिळाला आहे. तर दुसरीकडे, शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीच्या पार्श्वभूमीवर, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची पाकिस्तानच्या इस्लामाबादेत दाखल झाले आहेत. अराघची हे अमेरिकेच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या उद्देशाने अमेरिकेसोबत होणाऱ्या शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची शुक्रवारी रात्री उशिरा इस्लामाबादमध्ये दाखल झाले.






