गळा दाबला, शॉक दिला मग..., मुलानेच केली वडिलांची निर्घृण हत्या (फोटो सौजन्य-X)
Bangalore Crime News Marathi : कर्नाटकातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या परिसरात पोटच्या मुलानेच वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ११ मे रोजी घडलेल्या या हत्येचा प्रकार उघडकीस आला. जेव्हा पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्यास आणि घटनास्थळावरील सुरक्षा फुटेज तपासण्यास सांगण्यात आले. त्याच वेळी आरोपीने पोलिसांना सांगितले की, ही हत्या एक अपघात होती आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला. ही दुःखद घटना कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील आहे.नेमकं काय घडलं, जाणून घेऊया…
बुधवारी सकाळच्या वेळेत कपूरथला येथील फत्तुधिंगा गावात पेट्रोल पंपाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पथकाने मृताचा मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि तो ७२ तासांसाठी कपूरथळा सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवला आहे. सर्व पोलिस ठाण्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
११ मे रोजी रात्री मृत नागेश आणि त्याचा मुलगा सूर्या अपोलो आईस्क्रीम फॅक्टरीत होते. सीसीटीव्ही फुटेजनुसार, पहाटे १:४५ वाजता वडील आणि मुलामध्ये वाद झाला, ज्याचे रूपांतर हाणामारीत झाले. व्हिडिओमध्ये ५५ वर्षीय नागेश आपल्या मुलाला थप्पड मारताना दिसत आहे. तो त्याची चप्पल काढतो आणि सूर्याला मारतो. त्यानंतर नागेश सूर्याला मारण्यासाठी काठी उचलतो, जो त्याच्या वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न करतो. याचदरम्यान सूर्या पांढरा कापड धरलेला दिसतो. पण नागेश आपल्या मुलाकडे पाठ फिरवताच, तो त्याच्या वडिलांच्या गळ्यात एक पांढरा कापड गुंडाळतो, त्याला जमिनीवर ढकलतो आणि गळा दाबून त्याची हत्या करतो. घटनेनंतर सूर्याचा मित्र असलेला दुसरा माणूस त्याच्यासोबत येतो आणि नागेश मेला आहे की नाही याची खात्री करतो.
यानंतर प्रकरण लपवण्यासाठी दोन्ही मित्रांनी मृतदेह बेडवर ठेवला आणि त्याच्या बोटांना विजेचा झटका दिला. अपघात भासवण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पण नागेशची बहीण सविता हिला काहीतरी गडबड असल्याचे जाणवले आणि तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली, त्यानंतर सखोल तपास सुरू झाला.
अहवालानुसार, पोलिसांनी कारखान्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांना नागेशचा मृत्यू कसा झाला हे कळले. सूर्याला त्याच्या वडिलांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्या मित्राची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस हत्येमागील कारणांचा तपास करत आहेत आणि वडील आणि मुलामध्ये काही वाद सुरू होता का हे देखील शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.