शुक्रवारी संध्याकाळी जर्मनीतील हॅम्बुर्ग रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली. एका महिलेने स्टेशनवरील प्रवाशांवर चाकूने हल्ला केला, ज्यामध्ये 18 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. महिला हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांकडून तिची चौकशी सुरू असून, हल्ल्यामागे राजकीय प्रेरणा नाही, असा प्राथमिक निष्कर्ष आहे. मात्र, ती मानसिक आजारांनी ग्रस्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सावकाराच्या छळाला कंटाळून 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या; 30 ते 40 टक्के आकारलं जायचं व्याज
ही घटना संध्याकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी महत्त्वाचे असलेल्या या स्थानकावरील ट्रॅक १३ आणि १४ दरम्यान एक महिला अचानक चाकूसह लोकांवर तुटून पडली. प्रवासी त्या वेळेस ट्रेनमध्ये चढत किंवा उतरत होते, आणि त्यामुळे स्थानकात एकच खळबळ उडाली.
हल्ल्यानंतर चार ट्रॅक तात्काळ बंद करण्यात आले. यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना उशीर झाला किंवा त्यांचे मार्ग बदलण्यात आले. ICE हाय-स्पीड ट्रेन जवळ असताना ही घटना घडली, आणि त्याचे दरवाजे उघडे असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे हल्ला नेमका चढताना की उतरताना झाला हे अद्याप स्पष्ट नाही.
संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात
स्थानिक पोलिसांनी या प्रकरणात एका महिलेला अटक केली आहे. तिची सखोल चौकशी सुरु असून, तिने हा हल्ला कोणत्या हेतूने केला याचा तपास सुरु आहे. पोलिस प्रवक्ते फ्लोरियन अबेन्सेथ यांनी सांगितले की, “आमच्याकडे सध्या तरी असे कोणतेही पुरावे नाहीत की हल्ल्याचा राजकीय उद्देश होता. मात्र, संशयित महिलेच्या मानसिक आरोग्याची चौकशी सुरु आहे.”
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
हॅम्बुर्ग पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वरून माहिती दिली की, जखमींची संख्या उपलब्ध झालेली नाही, परंतु “अनेक” व्यक्तींना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हॅम्बुर्ग पोलिसांचे प्रवक्ते फ्लोरियन अबेन्सेथ यांनी घटनेबाबत माहिती देताना म्हटलं, “आतापर्यंत आमच्याकडे असे कोणतेही पुरावे नाहीत की महिलेने राजकीय प्रेरणेने हे कृत्य केले असावे.त्याऐवजी, आमच्याकडे असे निष्कर्ष आहेत ज्यांच्या आधारे आम्ही आता विशेषतः ती मानसिक रूग्ण आहे का याचा तपास करत आहोत,” असे त्यांनी पुढे सांगितले. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळास्थळी सतर्क राहण्याचे आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे, असेही प्रशासनाने म्हटले आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत, या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पोलिस संशयित महिलेची चौकशी करत आहेत.






