नेमकं काय घडलं?
रजनी शुक्ल आणि त्यांची १७ वर्षीय मुलगी या दोघीही घटनेच्यावेळी घरात होत्या. त्यावेळी आरोपी सुरेंद्र आला आणि त्याने मुलीला खोलीतून बाहेर काढले आणि घराचा दरवाजा आतून घट्ट बंद केला. यांनतर त्याने रजनी यांच्यावर एकामागून एक सपासप वार केले. यात भीषण हल्ल्यात रजनी गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर या प्रकरणातील आरोपीने त्याच खोलीत सल्फासच्या गोळ्या खाऊन आपली जीवनयात्रा संपवली.
या प्रकरणातल्या मुलीने तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बंद दरवाजा तोडून घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना रजनी शुक्ला आणि सुरेंद्र उर्फ सीताराम तिवारी या दोघांचाही मृतदेह आढळून आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमार्टमससाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
हत्येमागील कारण काय?
या हत्येमागील आणि आरोपीच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही आहे. पोलीस सध्या मृत महिलेच्या कुटुंबीयांची आणि आजूबाजूच्या लोकांची कसून चौकशी करत आहे. संपूर्ण पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर या हत्याकांडामागील रहस्य समोर येऊ शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
संतापजनक! आईस्क्रीमचे आमिष दाखवत ६ वर्षीय पुतणीवर चुलत्याचाच अत्याचार; आरोपी फरार
मध्यप्रदेश येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका सहा वर्षांच्या निष्पप मुलीवर तिच्याच सख्ख्या चुलत्यानेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आरोपीने पीडित मुलीला आईस्कीमचे आमिष दिले आणि त्यांनतर हे पाशवी कृत्य केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील रेवा जिल्ह्यात घडली.
Ans: मृत महिलेचे नाव रजनी शुक्ला असे होते.
Ans: आरोपीने सल्फासच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली.
Ans: पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.






