नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरुणीची ओळख काही काळापूर्वी आरोपी तरुणी आणि तिच्या प्रियकराशी झाली होती. आरोपीचा प्रियकर इंस्टाग्रामवरून पिडीतेच्या संपर्कात होता. संवादादरम्यान त्याने पीडितेच्या केसांचे कौतुक आपल्या प्रेयसीसमोर केले. इतकेच नाही तर, “मी तुझ्या मैत्रिणीला भेटायला जाणार आहे,” असे त्याने सांगितल्याने प्रेयसी प्रचंड संतापली.
Hyderabad Crime: वर्षभर बेपत्ता महिला घरातच पुरलेली, सांगाडा सापडताच खळबळ; नेमकं प्रकरण काय?
घरात घुसले आणि…
७ मार्च रोजी आरोपी तरुणीने पीडितेचा मोबाईल तपासाला होता. पण तेव्हा तिला काहीही संशयास्पद आढळले नव्हते. मात्र, मनात राग धरून तिने २५ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास टोकाचे पाऊल उचलले. आईस्क्रीमची डिलिव्हरी आली असावी, असे वाटून पीडितेने दरवाजा उघडताच प्रेयसीने तिला बाहेर ओढले आणि कात्रीने तिचे केस कापण्यास सुरुवात केली. या प्रकरणाचा व्हिडीओ आरोपीच्या मैत्रिणीने काढले. केस कापल्यानंतर “हेअर, नो हेअर” असे म्हणत हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. इतकेच नाही तर कापलेले काही केस सोबत घेऊन ती तिथून निघून गेली.
गुन्हा दाखल
यावेळी पीडितेने आरडाओरडा केल्याने इमारतीतील नागरिक जमा झाले. मात्र तोपर्यंत प्रेयसी आणि तिच्या मैत्रिणीनं पसार झाल्या होत्या. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून प्रियकर आणि पीडित यांच्यातील संबंधाच्या संशयातून हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी व तिच्या दोन मैत्रिणींनी इमारतीत विनापरवानगी प्रवेश करून हे कृत्य केलं.
Baramati Crime: देवदर्शन ठरलं मृत्यूचं कारण! भररस्त्यात मारहाण करून कारखाली चिरडलं; बारामतीतील घटना
Ans: प्रियकराने पीडितेच्या केसांची स्तुती केल्याचा राग.
Ans: आरोपीने घरात घुसून कात्रीने केस कापले व व्हिडिओ केला.
Ans: वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.






