नागपूरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका १८ वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. आरोपीचे नाव दिवाणशु मेरावी असे असून तो पाचपावली ठक्करग्राम येथील रहिवासी आहे. आरोपीवर बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा (POCSO Act) कलम चार अंतर्गत आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी हादरलं! पतीने केली पत्नीची हत्या, हत्या करण्याआधीच ठेवले भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस
नेमकं काय घडलं?
याबाबत सविस्तर माहिती अशी की पीडित १४ वर्षीय मुलगी शहरातील एका प्रतिष्ठीत शाळेत शिकते. दोन महिन्यापूर्वी इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिची आरोपीसोबत ओळख झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पिडीतेसोबत मैत्री केली. २३ ऑगस्ट रोजी मुलीने उत्तर नागपूर भागातील समता नगर येथे तिच्या आजीच्या घरी ती एकटी असतांना त्याला गप्पा मारण्यासाठी बोलावले.
तिच्या एकटेपणाचा फायदा घेत मुलाने तिचे वय माहित असतांना देखील तिथे तिच्यावर जबरदस्ती केली. घटनेनंतर पीडित मुलीने घाबरून ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही. परंतु त्या घटनेनंतर तिच्या वागण्यात बदल जाणवल्याने कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून आरोपीचा शोध करत आहे.
शिवसेना आमदार अमोल खताळांवर जीवघेणा हल्ला, एक तरुण आला अन्…
राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. संगमनेरमध्ये शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्या जीवघेणा हल्ला झाला आहे. संगमनेर फेस्टिवलच्या कार्यक्रमात त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. आमदार अनोल खताळ हे संगमनेरमध्ये ‘संगमनेर फेस्टिवल’च्या उद्घाटनाला आले होते.
‘संगमनेर फेस्टिवल’च्या उद्घाटनाला आले असताना शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. कार्यक्रमामध्येच एका तरुणाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे समजते आहे. आमदार अमोल खताळ यांना हस्तांदोलन करण्यासाठी पुढे आलेल्या तरुणाने अचानक त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
आमदार अमोल खताळ यांच्या एका तरुणाने हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. हा हल्ला त्याने का केला याचे कारण द्याप समोर येऊ शकलेले नाही. मात्र या घटनेने संगमनेरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच कार्यक्रमस्थळी शिवसेना आमदार अमोल खताळ यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले होते. या घटनेमुळे संगमनेरमधील वातावरण तापण्याची शक्यता आहे. पोलिसानी बंदोबस्त वाढवला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हललूयचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले असल्याचे समजते आहे.