Putin-Jinping Meet : Trump यांच्या दौऱ्यानंतर पुतिन-जिनपिंगची चीनमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; बीजिंगमध्ये नेमकं काय शिजतंय?
Putin-Jinping Meeting : ट्रम्प यांच्या दौऱ्यानंतर तातडीने पुतिन-जिनपिंग यांच्या उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे. या बैठकीने जागतिक राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली जाणून घेऊयात.
Putin-Jinping Meet : Trump यांच्या दौऱ्यानंतर पुतिन-जिनपिंगची गुप्त बैठक; बीजिंगमध्ये नेमकं काय शिजतंय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Follow Us:
Follow Us:
Trump यांच्या दौऱ्यानंतर पुतिन-जिनपिंगची गुप्त बैठक
बीजिंगमध्ये नेमकं काय शिजतंय?
जाणून घ्या सविस्तर
Putin-Jinping Meet News in Marathi : बीजिंग : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची बीजिंगमध्ये भेट घेतली. यावेळी ग्रेट हॉल ऑफ द पीपुल्स येथे दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उच्चस्तरीय शिखर परिषद पार पडली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या दौऱ्यानंतर लगेच झालेल्या या बैठकीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आगे. पाश्चात्य देशांचा वाढता दबाव आणि जागतिक पातळीवरील उलथापालथ लक्षात घेता दोन्ही देशांच्या भागीदारीने जागितक राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आपण या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याचा आपण आढावा घेणार आहोत.
मैत्री अधिक बळकट करणार : या बैठकीत दोन्ही नेत्यांनी २५ वर्षापूर्वी चीन(China)-रशिया सद्भावना आणि मैत्रीपूर्ण सहयोग कराराचा विस्तार करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पाश्चात्य देशांच्या एकतर्फी वर्चस्वाला कडाडून विरोध केला असून बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेचे रक्षण करण्यावर भर दिला आहे.
उर्जा क्षेत्रातील सहकार्य : याशिवाय दोन्ही देशांमध्ये पॉवर ऑफ सायबेरिया २ या महत्त्वकांक्षी गॅस पाइपलानवरही चर्चा झाली. याशिवाय चीनला दरवर्षी पुरवल्या जाणऱ्या अब्ज घनामीटर नैसर्गिक वायूच्या प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला. पुतिन यांनी चीनला रशियाचा अत्यंत विश्वासू उर्जा भागीदार म्हणून संबोधले.
पाश्चात्य देशांच्या धोरणावर टीका : दोन्ही देशांनी थेट अमेरिकेचे नाव न घेता लष्करी हस्तक्षेप आणि दबाव आणणाऱ्या धोरणांवर कडाडून टीका केली होत. तसेच जागतिक सागरी वाहतुकीत अडथळा आणण्याऱ्या अमेरिकेच्या प्रयत्नांचाही निषेध करण्यात आला.
तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भरता : विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिक सहकार्य आणि बौद्धिक संपदासारख्या क्षेत्रांमध्ये काही नवे करार झाले. पाश्चात्य तंत्रज्ञान आणि वित्तीय प्राणालीवरील अवलंबित्मव कमी करण्याच्या उद्देशाने हे करार करण्यात आले आहेत.
इराण मुद्द्यावरही चर्चा
याशिवाय दोन्ही नेत्यांनी इराण संघर्षावरही चर्चा केली. इराण संघर्ष (Iran Conflict) तातडीने थांबवण्याची गरज व्यक्त केली. यामध्ये शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी चीनच्या मध्यस्थीची भूमिका मांडली. दोन्ही नेत्यांनी रशिया (Russia) आणि चीन मैत्रीला विविध क्षेत्रांमध्ये एका नव्या उंचीवर नेण्यास सुरुवात केली असून अमेरिकेसह पाश्चात्य जगासाठी हा एक कूटनीतिक संदेश मानला जात आहे.