नेमकं काय घडलं?
या घटनेतील आरोपीचे नाव श्याम आनंदास माळी (राहणार धोंडाबे, तालुका चांदवड) असे आहे. श्याम माळी आणि त्याची पत्नी माया यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. दारूच्या व्यसनासाठी तो पत्नीकडून पैसे घेत होता. त्यासाठी तिचा वारंवार छळ देखील करत होता. या छळाला आणि मारहाणीला कंटाळून माया माहेरी गेली होती. शुक्रवारी श्याम याची समजूत काढण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी छाया जाधव, त्यांचे पती, आई आणि भाऊ हे श्यामच्या घरी गेले होते.
हा वाद शांततेत सोडवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र अचानक परिस्थिती बिघडली आणि श्यामने हल्ला चढवला. चाकूने पत्नी माया हिला मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र हा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर त्याने मिळूनी छाया हिला गाठलं. तिच्या छातीवर चाकूने वार केले. यात छाया गंभीर जखमी झाली. ती जागीच कोसळली. छायाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यात एक जण जखमी देखील झालाय.
याप्रकरणी मृत छाया यांचे पती ज्ञानेश्वर जाधव यांनी देवळा पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
नाशिकमध्ये दुर्दैवी घटना! पाण्याच्या बादलीत पडून 1 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
नाशिक येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एक वर्षाची चिमुकले घरात खेळता खेळता अचानक बाथरूम मध्ये गेली आणि तिथे पाण्याने भरलेल्या बादलीत डोकावून पाहिले मात्र हे तिच्या जीवावर बेतले. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककाळा पसरली आहे. घडलेली घटना ही नाशिक मधील आडगाव परिसरात घडली.
Ans: छाया ज्ञानेश्वर जाधव असे मृत महिलेचे नाव होते.
Ans: नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील भऊर फाटा परिसरात घटना घडली.
Ans: ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.






