दंतेवाडा : छत्तीसगडमधील (Chhattisgarh) काटेकल्याण भागातील दंतेवाडा येथे डीआरजी जवानांनी (DRG Force) चकमकीत पाच लाखांचे इनाम नक्षलवाद्याला ठार (Terrorist Killed) केले. एएसपी योगेश पटेल म्हणाले की, टीम नियमित गस्तीवर (Patrolling) निघाली होती. त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. जवानांनीही प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यानंतर परिसरात झडती घेतली असता एका पुरुष नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. ज्याची ओळख काटेकल्याण क्षेत्र समिती सदस्य मडवी अशी आहे. ज्यावर पाच लाख रुपयांचे बक्षीस होते.
काटेकल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एटेपळ जंगलात नक्षलवाद्यांचा वावर असल्याची माहिती दंतेवाडा पोलिसांना (Dantewada Police) मिळाली. त्यानंतर दंतेवाडा येथून सैनिकांची तुकडी पाठवण्यात आली. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास जवानांचे पथक या जंगलात पोहोचले. येथे सैनिकांचा नक्षलवाद्यांशी सामना होताच चकमक सुरू झाली. काही काळ दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता.
चकमकीनंतर परिसराची झडती घेण्यात आली. येथून एका नक्षलवाद्याचा मृतदेहही सापडला आहे. काटेकल्याण क्षेत्र समिती सदस्य मडवी कोसा असे त्याचे नाव आहे. नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला आहे. जवानांची टीम सध्या चकमकीच्या ठिकाणी आहे. सर्च ऑपरेशन सुरू आहे.