काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव सौरभ साखरे (वय 23, रा. चिंचपूर, ता. धारूर, जि. बीड) असे आहे. सौरभ हा आयटीआयमध्ये प्रथम वर्षांचे शिक्षण घेत होता. घटनेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री सौरभ आणि त्याच्या वर्गातील अमेय भीकही कोकरे( वय १९) हे दोघेही संस्थेच्या टेरेसवर झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर थेट हिंसेत झाले. संशयित आरोपी अमेय आपल्याकडील धारदार चाकूने सौरभवर अचानक हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात सौरभ गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र अतिरक्तस्रावामुळे उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. हत्येमागील नेमके कारण समोर आले नाही आहे. पोलीस याचा तपास करत आहे. या घटनेने सौरभच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून बीड जिल्ह्यातून त्याचे नातेवाईक मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.
कारसाठी २ लाख, फ्लॅटसाठी ३ लाख, तणावात गर्भपात आणि…; मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने संपवले जीवन
पुण्यातील चंदननगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चारचाकी गाडी, फ्लॅट खरेदीसाठी पैसे आणि सोन्याच्या अंगठीची मागणी करत सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पती, सासू आणि सासऱ्याविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
Ans: मृत विद्यार्थ्याचे नाव सौरभ संतोष साखरे होते.
Ans: ही घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गोणवडी येथील आयटीआयमध्ये घडली.
Ans: घोडेगाव पोलिसांनी आरोपी अमेय कोकरे याला अटक करून तपास सुरू केला आहे.






