सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या ‘छावा’ चित्रपटाने सर्वांनाच भुरळ पाडली आहे. गुन्हेगार देखील या चित्रपटाच्या प्रेमात पडले असल्याचे दिसत आहे. पुण्यातील मोक्कातील फरार असणारे दोन गुन्हेगार हा चित्रपट पाहिला आले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ते चित्रपत पाहत असतानाच त्यांची ‘टीप’ पोलिसांना लागली अन् काही वेळात थेटरमध्येच पोलिसांनी कारवाई यशस्वी केली. दोघांना चित्रपट गृहातून पोलिसांनी पकडले. हडपसरमधील एका मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात ही थरारक कारवाई झाली आहे.
धर्मेनसिंग ऊर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा (वय २२) आणि बादशाहसिंग पोलादसिंग भोंड (वय २३) अशी आहेत. हडपसर परिसरातील वैभव टॉकीज येथे आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट सहाने पकडले. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक छगन कापसे, कानिफनाथ कारखेले व त्यांच्या पथकाने केली आहे. दोघेही दिघी येथील शिव कॉलनीत राहतात. दोन्ही आरोपींवर मकोका, एनडीपीएस कायदा आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत.
नेमकं काय घडलं?
पाहिजे तसेच फरार आरोपींचा माग गुन्हे शाखेची पथके काढत आहेत. हद्दीत पेट्रोलिंग व गस्त घालून गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान, पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले यांना माहिती मिळाली की, पिंपरी-चिंचवड येथील दोन आरोपी हे येथील एका चित्रपटगृहात छावा चित्रपट पाहिला आले आहेत. स्क्रीन दोन येथे ते असल्याचे समजले. या माहितीनुसार पोलिसांनी चित्रपटगृहाच्या बाहेर पकडण्याचे ऑपरेशन सुरू केले. पण, वेळ न घालवता पथकाने स्क्रीन दोन येथे शिरून या दोघांना पकडले. ऐन चित्रपटाच्या सुरूवातीनंतर काही वेळातच हा थरार प्रेक्षकांना पाहायला मिळाला. पुढील कारवाईसाठी त्यांना दिघी पोलिस ठाण्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड; टोळक्याने दोन रिक्षा अन् 12 दुचाकी फोडल्या
साताऱ्यात मोठा दरोडा टाकण्याचा प्लॅन फसला
अजिंक्यतारा किल्ल्याच्या परिसरात दरोडे टाकण्याच्या उद्देशाने एकत्र असणाऱ्या चार जणांना सातारा शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्त कारवाई करून अटक केली. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्टल, पाच जिवंत काडतुसे, चार रिकाम्या पुंगळ्या, दोन मोटरसायकल, दोन लोखंडी सुरे, मोबाईल हँडसेट असा ४ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संबंधित आरोपी सातारा शहरातील सोन्याचे दुकान फोडून सोने चोरणार होते, अशी माहिती समोर आली आहे.