बिकानेरमध्ये ट्रक अन् कारचा भीषण अपघात (फोटो- istockphoto)
राजस्थानच्या बिकानेरमध्ये भीषण अपघात
कार आणि ट्रकच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू
जखमींना केले रूग्णालयात दाखल
बिकानेर: राजस्थानच्या बिकानेरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बिकानेरच्या श्रीडुंगरगड नॅशनल हायवेवर एक भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली आहे. दोन्ही गाड्यांची धडक इतकी भीषण होती की यामध्ये तब्बल ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जोरदार धडक असल्याने या सर्वांचे जागेवरच मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, या घटनेत एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. जखमी मुलीला जवळच रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अपघात घडतच स्थानिक नागरिक आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.
अपघात झालेली कार हरियाणाची असल्याचे म्हटले जात आहे. या कारमधून ७ प्रवासी प्रवास करत होते. गाडीतील प्रवासी एकाच कुटुंबातील असून ते हरियनाच्या फतेहाबाद जिल्ह्याचे रहिवासी असल्याचे समोर येत आहे. हे प्रवासी बिकानेर जिल्ह्यात एका धार्मिक कार्यासाठी आल्याचे समोर येत आहे.
बातमी अपडेट होत आहे…






