ट्विशा शर्मा केसमध्ये कुटुंबीयांना कोर्टाचा दणका (फोटो- सोशल मिडिया)
ट्विशा शर्मा केसमध्ये कुटुंबीयांना कोर्टाचा दणका
पुन्हा पोस्ट पोर्टम करण्याची याचिका फेटाळली
आरोपीला अटक झाल्याशिवाय अन्त्यसंस्कार न करण्याची भूमिका
Twisha Sharma Case: मध्यप्रदेशमधील ट्विशा शर्माचे मृत्यू प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. ट्विशा शर्माच्या (Crime) मृत्यूनंतर कुटुंबाने न्यायासाठी कठोर भूमिका घेतल्याने हे प्रकरण देशभर चर्चेत आले आहे. मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती असून प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. मात्र आता ट्विशा शर्माच्या प्रकरणात अजूनही आरोपीला शिक्षा झाली नाही ज्यामुळे कुटुंबाने तिचे अंत्यसंस्कार पुढे ढकलले आहे. जोपर्यंत आमच्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत अंतिम संस्कार केले जाणार नाहीत असा निर्धार ट्विशाच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यातच आता भोपाळ जिल्हा कोर्टाने ट्विशा शर्माच्या कुटुंबीयांना धक्का दिला आहे.
निवृत्त न्यायाधीश यांची सून असणारी ट्विशा शर्मा हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी बुधवारी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मृत ट्विशा हिचा दिल्ली एम्समध्ये पुन्हा पोस्टमॉर्टम करावा अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली होती. मात्र ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे न्यायाची प्रतीक्षा करत असलेल्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
कोर्टाने पुन्हा पोस्ट पोर्टम करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. तरी मृतदेह मध्य प्रदेश कोणत्याही सुरक्षित ठिकाणी किंवा शवगृहात ठेवण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे. ट्विशाचा मृतदेह सध्या भोपाळ एम्समध्ये ठेवण्यात आला आहे. मात्र मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी मायनस 80 तापमान असणे आवश्यक आहे, असे एम्सचे म्हणणे आहे. मात्र ही सुविधा भोपाळमध्ये नसल्याचे समोर येत आहे.
न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार नाही
ट्विशा शर्माच्या प्रकरणात अजूनही आरोपीला शिक्षा झाली नाही ज्यामुळे कुटुंबाने तिचे अंत्यसंस्कार पुढे ढकलले आहे. जोपर्यंत आमच्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत अंतिम संस्कार केले जाणार नाहीत असा निर्धार ट्विशाच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यातच आता ट्विशाच्या मृत्यूला ९ दिवस पालटून गेल्याने पोलिसांनी आता कुटुंबाला पत्र लिहित विशेष अपील केली आहे.
उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील रहिवाशी ट्विशा शर्माचं लग्न मध्य प्रदेशच्या भोपाळ येथील वकिल समर सिंह याच्याशी करण्यात आले होते. माहितीनुसार, समर सिंह हा माजी न्यायाधिश गिरिबाला सिंह यांचा मुलगा आहे. लग्नात ट्विशाच्या कुटुंबियांनी वर पक्षाला भरगच्च हुंडा दिला पण तरीही लग्नानंतर तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. याच छळाला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या अवघ्या ५ महिन्यांतच ट्विशाने आपले आयुष्य संपवले ज्यानंतर ही घटना देशभर चांगलीच रंगली.






