(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Zee Marathi वाहिनेवरील ‘कमळी’ मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या मालिकेची विशेष गोष्ट म्हणजे यात दर आठवडण्यात नवीन काही गोष्टी पाहायला मिळतात.कमळीने मोठ्या जिद्दीने अभ्यास करत मुंबई विद्यापीठात पहिला क्रमांक पटकावला. या यशानंतर ती आनंदाने आपल्या गावाकडे परतली. गावात तिच्या यशाचा जल्लोष करत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मात्र या आनंदाच्या वातावरणात एक धक्कादायक सत्य समोर आले. गावात लावलेल्या पोस्टरमधून कमळीला कळले की तिचे आजोबा आता हयात नाहीत आणि त्यांचे पुण्यस्मरण सुरू आहे. या बातमीने कमळी पूर्णपणे हादरली आणि ती मानसिक धक्क्यात गेली. आबांच्या निधनांनतर कमळी मुंबईला जाणार नाही, ती गावीच राहिल. या निर्णायामुळे तिच्या शिक्षणात अडथळा निर्माण होईल, असं तिच्या आईला वाटत असतं.
आपल्या लाडक्या आजोबांच्या अचानक जाण्याने कमळी प्रचंड खचते. कमळी आबांना आता पुन्हा कधीच भेटणार नाही, याचे दु: ख तिला होत असतं. या सगळ्या परिस्थितीचा विचार करत कमळी गाव सोडून जाण्यास नकार देते. तिला आता पुन्हा मुंबईला जाण्यात काहीच रस नसतो. पण, यामुळे तिचे मोठे नुकसान होईल शिक्षण पुन्हा एकदा थांबणार.. त्यामुळे तु हा चुकीचा निर्णय घेऊ नकोस असं निंगी तिला बजावून सांगत असते. मात्र, कमळी कोणाचंही ऐकत नाही. शेवटी कमळीची मनधरणी करण्यासाठी हृषी कोल्हापूरला जाणार असल्याचे कळत आहे.
नुकताच झी मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यात दाखवले आहे की, हृषी कोल्हापूरला पोहोचला आहे. कमळीची मानसिक अवस्था बिकट असून यातूनच ती चुकीचा निर्णय घेणार याची त्याला खात्री असते. त्यामुळे आता तो स्वत: तिला परत आणण्यासाठी कोल्हापुरला गेला आहे. कमळी हृषीला सांगते, “मी आता माझं गाव सोडून कुठेही जाणार नाही.”
View this post on Instagram
कमळीच्या निर्णयानंतर हृषीनेही ठाम भूमिका घेतली आहे. “तू गाव सोडणार नाहीस तर मीही इथेच राहणार,” असा निर्धार त्याने व्यक्त केला आहे. तसेच, कमळीला उद्देशून तो म्हणतो, “माझं हे गावात राहण्याचं खूळ तेव्हाच जाईल, जेव्हा तू माझ्यासोबत मुंबईला येशील.” हृषीच्या या वक्तव्यामुळे कथेत नवा ट्विस्ट निर्माण झाला असून पुढील घडामोडींकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.






