(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते Salim Kumar यांचे निधन झाले आहे. शनिवारी, ६ जून रोजी रात्री १०:४३ वाजता कोची येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या अवघ्या ५६व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने मल्याळम चित्रपटसृष्टीसह संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलीम कुमार यांना काही काळापासून विविध आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत होता. प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
६ जूनच्या रात्री रुग्णालयाने जारी केलेल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, “व्हेंटिलेटर सपोर्ट, अँटीबायोटिक्स आणि डायलिसिससह अनेक वैद्यकीय उपाययोजना करण्यात आल्या. मात्र रुग्णालयात दाखल असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि सर्व प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही.”माध्यमांतील वृत्तांनुसार, सलीम कुमार यांना किडनीच्या समस्यांसोबतच लिव्हर सिरोसिस आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) या गंभीर आजारांचाही त्रास होता. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. निधनाच्या अवघ्या एक दिवस आधी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
‘मी माझं वास्तव…, वर्षभरानंतर सोशल मीडियावर परतलेल्या तापसी पन्नूने व्यक्त केला संताप,म्हणाली…
नाटक, मिमिक्रीपासून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा प्रवास
सलीम कुमार यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात नाटक आणि मिमिक्री कलाकार म्हणून केली. या क्षेत्रात लोकप्रियता मिळवल्यानंतर त्यांनी १९९७ मध्ये मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यांच्या अभिनयातील सहजता आणि विनोदी शैलीमुळे ते अल्पावधीतच मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार बनले.त्यांनी Thenkasipattanam, One Man Show, Meesa Madhavan, Kalyanaraman आणि CID Moosa यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले.Achanurangatha Veedu या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर Adaminte Makan Abu या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह अनेक सन्मान पटकावले.सलीम कुमार यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीने एक प्रतिभावान आणि अष्टपैलू कलाकार गमावला आहे. त्यांच्या अभिनयाची छाप आणि त्यांनी साकारलेल्या अविस्मरणीय भूमिका कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.






