Khekda Bhaji Recipe : खेकडा भजी हे खेकड्यापासून नाही तर कांद्यापासून तयार केले जातात. काही निवडक मसाले आणि कुरकुरीतपणामुळे यांची चव फार अप्रतिम लागते. पावसाळ्यात खेकडा भजी आवर्जून खाल्ले जातात.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
खेकडा भजी पावसाळ्यात सर्वाधिक बनवली जाणारी डिश आहे.
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ही एक परफेक्ट रेसिपी ठरते.
तुम्ही फार कमी वेळेत ही रेसिपी तयार करु शकता.
तुम्ही आजवर अनेक प्रकारचे भजी ऐकले आणि खाल्ले असतील जसे की, कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी परंतु तुम्ही कधी खेकडा भजीची रेसिपी ट्राय केली आहे का? हे भजी चवीला फार कुरकुरीत आणि अप्रतिम लागतात. शिवाय फार कमी वेळेत आणि स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून त्यांना तयार केले जाते. पावसाच्या थंड वातावरणात आपल्याला अनेकदा गरमा गरम भजी खाण्याची फार इच्छा होत असते. अशावेळी काहीतरी नवीन म्हणून तुम्ही ही रेसिपीट्राय करु शकता. चला खेकडा भजी बनवण्यासाठी कोणत्या साहित्यांची गरज लागते ते जाणून घेऊया.