दिल्ली, मुंबईसह ५ आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी (Photo Credit - X)
Email Bomb Threat: दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर (Delhi Bomb Blast) सुरक्षा यंत्रणांचा तपास सुरू असतानाच, दिल्ली विमानतळावर बॉम्बची धमकी मिळाल्याने काही काळ खळबळ उडाली. दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास बॉम्बची धमकी आल्याची नोंद करण्यात आली. धमकी मिळताच तात्काळ सुरक्षा तपासणी (Security Check) सुरू करण्यात आली. तपासणीनंतर, अग्निशमन विभागाने ही धमकी खोटी (Hoax) असल्याची पुष्टी केली.
विमानतळांनां लक्ष्य करण्याचा उल्लेख
तसेच दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, इंडिगो एअरलाईनच्या तक्रार पोर्टलवर हा धमकीचा ईमेल आला होता. या ईमेलमध्ये केवळ दिल्लीच नव्हे, तर चेन्नई आणि गोवा येथील विमानतळांनाही लक्ष्य करण्याचा उल्लेख होता. खबरदारी म्हणून, उल्लेख केलेल्या सर्व ठिकाणी कसून तपासणी करण्यात आली. लाल किल्ल्याजवळील स्फोट आणि विमानतळाला मिळालेली धमकी या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, पुढील तपास सुरू आहे.
A bomb threat was reported at Delhi Airport’s Terminal 3 around 4 p.m., prompting an immediate security check. The fire department later confirmed it was a hoax: DFS According to Delhi Police, the threat email was received on IndiGo’s grievance portal and mentioned airports in… pic.twitter.com/TN7bgaPKxX — IANS (@ians_india) November 12, 2025
एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला बॉम्बची धमकी
मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला उड्डाणादरम्यान बॉम्बची धमकी मिळाल्याने लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला. विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आणि लगेचच आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि बॉम्ब निकामी पथकाने विमानाची कसून तपासणी केली. आतापर्यंत कोणतेही संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत.
अधिकृत निवेदन
एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, “वाराणसीला जाणाऱ्या आमच्या एका विमानाला सुरक्षा धोक्याची सूचना मिळाली. प्रोटोकॉलनुसार, सरकारने नियुक्त केलेल्या बॉम्ब धमकी मूल्यांकन समितीला तात्काळ कळवण्यात आले आणि सर्व आवश्यक सुरक्षा उपाययोजना त्वरित सुरू करण्यात आल्या. विमान सुरक्षितपणे उतरले आणि सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले. सर्व अनिवार्य सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर विमानाला ऑपरेशनसाठी सोडण्यात येईल.”
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर विमानतळांवर हाय अलर्ट
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर, देशभरातील विमानतळांवर सुरक्षा एजन्सींना हाय अलर्ट देण्यात आला आहे आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवरही सुरक्षा कडक करण्यात आली आहे. सीआयएसएफ आणि विमानतळ पोलिस कर्मचारी विमानतळांच्या आत आणि बाहेर तैनात करण्यात आले आहेत. श्वान पथके आणि बॉम्ब निकामी पथके देखील सतर्क ठेवण्यात आली आहेत.






